Court : पुलवामा हल्ल्याचा आनंद साजरा केला, आता कोर्टाने चांगलाच दणका दिला..

Court : NIA कोर्टाने पुलवामा हल्ल्याचा आनंद साजरा करणाऱ्या तरुणाला कायमचा धडा शिकविला..

Court : पुलवामा हल्ल्याचा आनंद साजरा केला, आता कोर्टाने चांगलाच दणका दिला..
NIA कोर्टाने सुनावली शिक्षाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 3:24 PM

बंगळूरु : पुलवामा हल्ल्याचा (Pulwama Attack) आनंद साजरा (Celebration) करणाऱ्या तरुणाला बंगळुरु येथील NIA कोर्टाने दणका दिला. 21 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने (Engineering Student) दहशतवादी कृत्याचे जाहीर समर्थन केले होते. फेसबूकवर (Facebook) त्याने अत्यंत अपमानजनक पोस्ट लिहित पुलवामा हल्ल्याचे सेलिब्रेशन केले होते. त्याविरोधात कोर्टात खटला चालविण्यात आला.

NIA कोर्टाने प्रकरणात आरोपी तरुणाला 5 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. कोर्टाने निकाल देताना मत मांडले की, तरुणाची फेसबुकवरील पोस्ट पाहता, तो भारतीय नसल्याचेच चित्र दिसते.

अतिरिक्त शहर दिवाणी व सत्र न्यायाधीश गंगाधर सी.एम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष NIA कोर्टाने हा निकाल दिला. अभियोग पक्षाने, अर्थात सरकारी पक्षाने दिलेल्या ठोस पुराव्यांवरुन आरोपीने त्याच्या फेसबूकवरुन अपमानजनक मजकूर पोस्ट केल्याचे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

बंगळुरुमधील अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने पुलवामा येथे CRPF जवानांवर आत्मघाती हल्ल्याचा आनंद व्यक्त केला होता. तसेच याबाबत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

आरोपीने केवळ एक दोन अपमानकारक पोस्ट केलेल्या नाहीत. अनेक वृत्त वाहिन्यांच्या फेसबूक पेजवर जाऊन यासंदर्भातील बातम्यांवर तशाच कॉमेंट केल्या आहेत. आरोपी हा अशिक्षित नाही तर उच्च शिक्षण घेत आहे.

आरोपीने जाणीवपूर्वक अशा पोस्ट केल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. आरोपीचे कृत्य आणि त्याची मते ही या महान राष्ट्राच्या विरोधात असल्याचे मत नोंदवत एनआय कोर्टाने आरोपी विद्यार्थ्याला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

पुलवामा हल्ल्यानंतर अपमानजनक शब्दात त्याने भारतीय फौजेची खिल्ली उडवली. हा केवळ ट्रेलर आहे आणि पिक्चर बाकी असल्याचा दावा त्याने केला. हा राम मंदिराचा अल्पसा बदला असल्याचे फेसबूकवरील पोस्टमध्ये आरोपीने लिहिले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.