सावधान, वर्षभरात दुप्पट झाल्यात 500च्या बनावट नोटा, 2000 रुपयांच्या खोट्या नोटांत 54 टक्क्यांची वाढ
नोटाबंदी ही बाजारातील खोटे चलन बाद करण्यासाठी असल्याचे सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आले होते. काळा पैसा हाही यामागचा मुख्य हेतू होताच. पण आत्ता सध्याची स्थिती पाहता, चलनात असलेल्या बनावट नोटांचे प्रमाण पाहता, हा पुन्हा एकदा सरकारसमोरचा चिंतेचा विषय झालेला आहे.
नवी दिल्ली – तुम्ही जर 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा वापरत असाल, तर सावधान. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)दिलेल्या माहितीनुसार वित्तीय वर्ष 2021-22मध्ये खोट्या नोटांची (counterfeit )चलनातील संख्येत मोठी वाढ झालेली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 500 रुपयांच्या नकली नोटा एका वर्षांत दुप्पट (double)झाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत 500 रुपयांच्या 101.9 टक्के जास्त नोटा चलनात असल्याचे, तर 2000 रुपयांच्या 54.16 टक्के जास्त नोटा चलनात असल्याचे रिझर्व्ह बँकेने शोधले आहे. बनावट नोटांची वाढती संख्या अडचणी आणि चिंता वाढवणारी आहे.
Annual Report for the Year 2021-22https://t.co/jRbtcwrzEZ
हे सुद्धा वाचा— ReserveBankOfIndia (@RBI) May 27, 2022
500 आणि 2000च्या 87 टक्के नोटा बनावट
31 मार्च 2022 पर्यंत बँकेत जमा करण्यात आलेल्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांपैकी 87.1 टकके नोटा या बनावट असल्याची धक्कादायक माहिती रिझर्व्ह बंकेने दिली आहे. 31 मार्च 2021पर्यंत हा आकडा 85.7 टक्के इतका होता. 31मार्च 2022चा विचार केला तर एकूण चलनात हा आकडा 21.3 टक्के इतका मोठा आहे. म्हणजे चलनात असलेल्या 21.3 टक्के नोटा या बनावट आहेत.
50 आणि 100च्या बनावट नोटांचे प्रमाण कमी
इतर नोटांचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 रुपयांच्या खोट्या नोटा 16.4 टक्के तर 20 रुपयांच्या खोट्या नोटांच्या प्रमाणात 16.5 टक्के वाढल्या आहेत. यासह 200 रुपयांच्या खोट्या नोटांच्या संख्येत 11.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यावर्षात 50 रुपयांच्या खोट्या नोटा 28.7 टक्के तर 100 रुपयांच्या खोट्या नोटा 16.7 टक्क्यांवी कमी झाल्या आहेत.
8 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती नोटाबंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता टीव्हीवर येत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 500 रुपयांच्या नोटा नव्या स्वरुपात बाजारात आल्या. नोटाबंदीनंतरच 2000 रुपयांची नोट अस्तित्वात आली. नोटाबंदी ही बाजारातील खोटे चलन बाद करण्यासाठी असल्याचे सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आले होते. काळा पैसा हाही यामागचा मुख्य हेतू होताच. पण आत्ता सध्याची स्थिती पाहता, चलनात असलेल्या बनावट नोटांचे प्रमाण पाहता, हा पुन्हा एकदा सरकारसमोरचा चिंतेचा विषय झालेला आहे.