Bharat Bandh : उद्या नाही मिळणार दूध-फळ आणि भाज्या, फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू

या बंदवेळी दुपारी तीन वाजेपर्यंत देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे.

Bharat Bandh : उद्या नाही मिळणार दूध-फळ आणि भाज्या, फक्त 'या' सेवा राहणार सुरू
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 9:46 AM

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान 8 तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे. (bharat bandh news milk fruits and vegetables will not be available on 8 December 2020)

या बंदवेळी दुपारी तीन वाजेपर्यंत देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे 8 तारखेला म्हणजेच उद्या सर्व व्यवहार आणि वाहतूक ठप्प राहिल असं बोललं जात आहे.

8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.

राज्यातील प्रमुख एपीएमसी मार्केट बंद

दरम्यान, महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचा मंगळवार (08 डिसेंबर) रोजी संप करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी व माथाडी कामगार सहभागी होणार असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत माथाडी नेता नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजारसमितीच्या संचालक उपस्थित होते.

शिवसेना, काँग्रेसचा पाठिंबा, राष्ट्रवादीच्या निर्णयाची शक्यता

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. मोठ्या संख्येनं या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस भारत बंदमध्ये सहभागी होण्याबाबत आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. (bharat bandh news milk fruits and vegetables will not be available on 8 december 2020)

इतर बातम्या – 

‘8 डिसेंबरचा भारत बंद यशस्वी झाला तर मोदी सरकारला ती शेतकऱ्यांची नोटीस असेल’

दिल्ली शेतकरी आंदोलन : महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या भूमिका काय?

(bharat bandh news milk fruits and vegetables will not be available on 8 December 2020)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.