कधी चिडवणं तर कधी लाड; राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं बालपण आठवेल
सरकारने माझ्या भावाची प्रतिमा मलिन करण्यासाठी हजारो कोट्यवधी रुपये खर्च केले. पण माझा भाऊ सत्याच्या मार्गावरून तसूभरही ढळला नाही.
गाझियाबाद: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ही यात्रा आता देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात पोहोचली आहे. 9 दिवसाच्या विश्रांतीनंतर ही यात्रा सुरू झाली आहे. गाझियाबादमध्ये ही यात्रा पोहोचल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी आणि सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. या ठिकाणी एक सभा पार पडली. या सभेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी हे प्रियंका गांधी यांना कधी चिडवताना, कधी लाड करताना तर कधी त्रास देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून भावाबहिणीचं प्रेम असावं तर असं अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही.
❤️❤️ pic.twitter.com/9MIQKMIdAQ
— Congress (@INCIndia) January 3, 2023
गाझियाबादमध्ये यात्रेच्या स्वागतादरम्यान राहुल गांधी हे बहीण प्रियंका यांचे लाड करताना दिसत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. त्यात राहुल गांधी प्रियंका यांच्या कानात काही तरी सांगताना दिसतात. त्यानंतर लहान मुलाने आपल्या बहिणीचे लाड करावेत तसे लाड ते आपल्या बहिणीशी करताना दिसत आहेत.
भावा-बहिणीमध्ये जबरदस्त बॉन्डिंग दर्शविणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर लोक जबरदस्त प्रतिक्रिया देतानाही दिसत आहे. भावाबहिणीचं प्रेम असावं तर असं. भावाबहिणीचं नातं असंच वृद्धिंगत राहो, अशा प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमात प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांची योद्धा म्हणत स्तुती केली. सर्व एजन्सी राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करताना दिसत आहेत. पण माझा भाऊ वीर योद्ध्यासारखा पुढे जाताना दिसत आहे. मला त्याचा अभिमान आहे.
भाई बहन का निश्छल प्रेम#BharatJodoYatra pic.twitter.com/qBFxzRY4JE
— Bharat Jodo (@bharatjodo) January 3, 2023
राहुल गांधी यांनी प्रेम आणि करुणेचं दुकान उघडलं आहे. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक मोहल्ल्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात हे दुकान असावं. नाही तर द्वेषाचं राजकारण पुढे जाईल.लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक होणार नाही, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
सरकारने माझ्या भावाची प्रतिमा मलिन करण्यासाठी हजारो कोट्यवधी रुपये खर्च केले. पण माझा भाऊ सत्याच्या मार्गावरून तसूभरही ढळला नाही. अनेक एजन्सींच्या मार्फत त्यांना घाबरवण्याचे प्रयत्न केले गेले. पण माझा भाऊ घाबरला नाही.
अदानी, अंबानीने देशात सर्व काही खरेदी केले. पण माझ्या भावाला खरेदी करण्यात ते अपयशी ठरले. अदानी, अंबानी यांनी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या भावाला कोणीच खरेदी करू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या.