Bharat Ratna : कोण आहेत ते पाकिस्तानी नागरिक ज्यांना मिळालाय भारतरत्न

Bharat Ratna award : भारतरत्न हा पुरस्कार देशातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. जो

Bharat Ratna : कोण आहेत ते पाकिस्तानी नागरिक ज्यांना मिळालाय भारतरत्न
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 6:02 PM

Bharat ratna Award : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. पीएम मोदी म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी हे आपल्या काळातील सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक आहेत. भारतरत्न सर्वोच्च सन्मान भारतीय नागरिकांना देशसेवेतील त्यांच्या विशेष योगदानासाठी दिला जातो. पण काही प्रसंगी परदेशी नागरिकांनाही भारतरत्न देण्यात आला आहे. ज्यामध्ये नेल्सन मंडेला आणि मदर टेरेसा यांचा समावेश आहे. भारताने एका पाकिस्तानी नागरिकाला देखील भारतरत्न दिला आहे. कोण आहे ती व्यक्ती जाणून घेऊयात.

बादशाह खान यांना भारतरत्न

पाकिस्तानमधील ‘बादशाह खान’ यांना देखील भारतरत्न देण्यात आला आहे. कोण आहेत बादशाह खान. त्यांना भारताचा हा सर्वोच्च सन्मान का देण्यात आला जाणून घ्या.

फाळणीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली होती. देशाचे दोन तुकडे झाल्याने अनेकांना वेदना झाल्या होत्या. त्यापैकीच एक व्यक्ती म्हणजे अब्दुल गफ्फार खान, ज्यांना बादशाह खान या नावानेही ओळखले जात होते. ते देखील महात्मा गांधींच्या मार्गावर चालत होते. खान अब्दुल गफार खान यांचे कार्यस्थान पाकिस्तानात गेल्यामुळे त्यांना त्याचा त्रास झाला होता. अब्दुल गफ्फार खान यांचा जन्म ब्रिटिश भारतातील पेशावरमध्ये झाला होता. ते सुन्नी मुस्लीम कुटुंबात ६ फेब्रुवारी १८९० रोजी जन्माला आले होते.

अब्दुला खान यांच्याकडून लढ्याची प्रेरणा

बादशाह खान यांना आजोबा अब्दुल्ला खान यांच्याकडून राजकीय लढ्याची प्रेरणा मिळाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या होत्या. अब्दुल गफार खान यांनी अलिगढमधून ग्रॅज्युएशन केले. पेशावरमध्ये 1919 मध्ये मार्शल लॉ लागू झाला तेव्हा शांतता प्रस्ताव मांडल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आली. ब्रिटीश सरकारने त्यांना खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही साक्षीदार न मिळाल्याने त्यांना सहा महिने तुरुंगात ठेवण्यात आले.

अब्दुल गफ्फार खान यांनी वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी पेशावरमध्ये शाळा सुरु केली होती. इंग्रजांना ते चालवणे आवडले नाही म्हणून त्यांनी 1915 मध्ये त्यावर बंदी घातली. यानंतर त्यांनी जागृती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेकडो लोकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी समाजसेवा आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.

महात्मा गांधीचा प्रभाव

1928 मध्ये अब्दुल गफ्फार यांनी महात्मा गांधी यांची भेट घेतली. अब्दुल गफार खान यांच्यावर महात्मा गांधींचा इतका प्रभाव होता की त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोघेही अहिंसक विचारांमुळे जवळ आले आणि नंतर धर्मनिरपेक्ष, अविभाजित आणि स्वतंत्र भारतासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला.

देश स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होता. याची जबाबदारी इंग्रज सरकारने लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर सोपवली होती. भारताची सद्यस्थिती पाहता त्यांनी फाळणी हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटले. त्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी यासंबंधीचे विधेयक मंजूर केले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.