आसारामचे 10 हजार कोटींचे साम्राज्य सांभाळणारी महिला आहे कोण?
आसाराम आणि नारायण साई तुरुंगात गेल्यानंतर त्यांचा साम्राज्याचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न निर्माण झाला होता. आसारामच्या 400 हून अधिक आश्रम कोण सांभाळणार?
नवी दिल्ली : आसारामला (Asaram) शिक्षा जाहीर झाली, तेव्हापासून आसाराम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जोधपूरनंतर अहमदाबादमधील कोर्टाने (ahmadabad court) आसारामला जन्मठेप सुनावली. एकवेळी पैशांच्या जीवावर लोकांचं मनोरंजन करणारा आसाराम आता कारागृहातून बाहेर येणे अवघड आहे. धर्मगुरू असल्याचे भासवून आसारामने एवढी संपत्ती (Asaram Bapu bio Property) कमवली की प्राप्तिकर विभागालाही घाम फुटला होता. आता आसारामची 10 हजार कोटींची संपत्ती व 400 आश्रम कोण सांभाळत आहे? हा प्रश्न सर्वांना आहे.
कोण आहे भारतीदेवी
आसाराम आणि नारायण साई तुरुंगात गेल्यानंतर त्यांचा साम्राज्याचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न निर्माण झाला होता. आसारामच्या 400 हून अधिक आश्रम कोण सांभाळणार? आसारामशी भक्त अजून जोडले जातील का? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणून आसाराम यांची मुलगी भारती देवी पुढे आली आहे. आसारामच्या संपत्तीची देखरेख तिची मुलगी भारती देवी करत आहे.
भारती श्रीचा घटस्फोट
‘भारती श्री’ किंवा ‘श्रीजी’ नावाने तिची ओळख आहे. तिची आसारामच्या अनुयायांवर चांगली पकड आहे. तिने M.Com ची पदवी घेतली. 1997 मध्ये तिने डॉ. हेमंत यांच्याशी लग्न केले. मात्र, नंतर तिचा घटस्फोट झाला. यामागेही आसारामचा हात असल्याचे बोलले जात आहे. मुलगी आणि जावई यांच्या नात्यात तो कमालीचा ढवळाढवळ करायचा. यानंतर भारती देवीची एंट्री आसारामच्या आध्यात्मिक व्यासपीठावर झाली.
प्रसिद्धीपासून दूर
अनेक वर्षांपूर्वी ‘संत श्री आसाराम ट्रस्ट’ची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे, परंतु आसारामने देश-विदेशात जे आश्रम, शाळा किंवा इतर संस्था बांधल्या आहेत, त्या भारतीदेवी या ट्रस्टच्या माध्यमातून पाहत आहेत. भारती गेल्या 19 वर्षांपासून आश्रम आणि ट्रस्टचे व्यवस्थापन करत आहेत, परंतु ती नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. आसारामच्या अनुयायांमध्येही त्यांची चांगली प्रतिमा आहे.
2013 मध्ये भारती देवी चर्चेत आसारामला अटक झाल्यानंतर त्याच काळात 2013 मध्ये भारती देवीचं नाव पहिल्यांदाच चर्चेत आलं होतं. भारती देवी आणि तिची आई लक्ष्मी देवी यांनाही बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुरत येथील बलात्कार प्रकरणात आसारामनंतर भारती देवी या दुसऱ्या क्रमांकाच्या आरोपी होत्या, तर आसारामची पत्नी लक्ष्मीबेन तिसऱ्या क्रमांकाच्या आरोपी होत्या. मात्र, 31 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने भारती देवी आणि लक्ष्मीबेन यांना निर्दोष घोषित करण्यात आले. 2013 मध्येच आसाराम आणि नारायण साई तुरुंगात गेल्यापासून भारतीदेवी आसारामची गादी सांभाळत आहे.
महागड्या गाड्यांची आवाड
भारती देवी यांना महागड्या गाड्यांची आवाड आहे, परंतु आसाराम आणि नारायण साई तुरुंगात गेल्यानंतर तिने आपली जीवनशैली बदलली. तिने लोकांमधील थेट संपर्क कमी केला. तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्या अहमदाबादमधील आश्रमात राहतात आणि नियमितपणे येथे होणाऱ्या आरतीला उपस्थित राहतात. त्यांची प्रवचनेही सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जातात.