Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी पाहिलाय का 24 कोटींचा रेडा, सलमान खान याच्यासह अनेक स्टारने लावली बोली

राजस्थानमधील शेतकरी मेळावा सध्या चर्चेत आला आहे. या मेळाव्यात आलेल्या एका रेडा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. कारण या रेड्याची किंमत तब्बल 24 कोटी रुपये आहे. देशातील नाही तर जगातील सर्वात महागडा हा रेडा असल्याचे म्हटले जातंय.

कधी पाहिलाय का 24 कोटींचा रेडा, सलमान खान याच्यासह अनेक स्टारने लावली बोली
Bheem Buffalo
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 10:16 AM

जयपूर : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याचा घोडेबाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात देशभरातून जातीवंत घोडे येतात. हे घोडे खरेदीसाठी स्टार मंडळींकडून मोठी मागणी असते. घोडे खरेदी-विक्रीसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. सारंगखेडा बाजारात येणाऱ्या काही घोड्यांची किंमत कोटींमध्ये असते. अनेक अश्वप्रेमी महागडे घोडे पाहण्यासाठी सारंगखेडा घोडे बाजरात दाखल होत असतात. सारंगखेड बाजाराप्रमाणे राजस्थानमधील एका शेतकरी मेळाव्यात घोडा नाही तर रेडा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या रेड्याची किंमत तब्बल 24 कोटी रुपये आहे.

शेतकरी मेळाव्यात आला रेडा

राजस्थानमधील जोधपूरमध्ये शेतकरी मेळावा सुरु आहे. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण भीमा नावाचा रेडा आहे. हा रेडा मुर्रा जातीची आहे. या मेळाव्यात दाखल होणारा नेता असो, मंत्री असो की सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येकजण या रेड्याला पाहण्यासाठी येत आहे. त्याच्यासोबत सेल्फी घेत आहे. त्याला फक्त पाहण्यासाठी अनेक जण शेतकरी मेळाव्यात येत आहे.

सलमान खानकडून झाली मागणी

भीमा नावाचा हा रेडा अरविंद प्रजापत यांचा आहे. त्यांनी सांगितले की, भीमा हा मुर्राह जातीचा रेडा आहे. म्हशी अन् रेड्यात मुर्राह जात ही देशातील पहिल्या क्रमांकाची आहे. हा रेडा फक्त नावानेच भीमा नाही, तर त्याच्या उंचीमुळे रुबाबदार दिसत आहे. त्याला पाहण्यासाठी देश-विदेशातूनही लोक येतात. भीमा खरेदीसाठी 24 कोटींपर्यंत मागणी आली आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अनेक देशांतील प्रसिद्ध उद्योगपतींनी भीमाच्या खरेदीसाठी आपला कल दाखवला आहे.

हे सुद्धा वाचा

अशी असते देखरेख

अरविंद प्रजापत यांनी सांगितले की, आठ वर्ष वय असणाऱ्या भीमाची देखभाल करण्यासाठी 3 ते 4 जणांची टीम आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ 5 ते 7 किलोमीटर त्याला चालण्यासाठी घेऊन जातात. त्याच्या जेवणावर रोजचा चार ते पाच हजार रुपये आहे. अंडी, दूध, लोणी, सुका मेवा, फळे यांच्यासोबत हंगामानुसार त्याला चारा दिला जातो. त्याच्या प्रकृतीची नियमित तपासणी होते. दर 15 दिवसांनी त्याची मालिश केली जाते अन् त्याला भादरले जाते. त्याची उंची 6 फूट आणि लांबी सुमारे 14 फूट आहे.