Crime News: भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या, जाणून घ्या नेमके काय घडले?

इंद्रमोहन विवाहित असूनही त्याचे सहकलाकार असलेली भोजपुरी अभिनेत्री नेहा वर्मासोबत त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत. इंद्रमोहन त्याची गर्लफ्रेंड नेहा वर्मासोबत 21 डिसेंबर 2021 रोजी गोरखपूरहून खागा शहरातील आपल्या घरी आला होता.

Crime News: भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या, जाणून घ्या नेमके काय घडले?
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 6:38 PM

फतेहपूर : अनैतिक संबंधातून एका भोजपुरी अभिनेत्याने आपल्या पत्नीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील खागा कोतवाली भागातील कुरा मजरे गुलरियनपार गावात घडली आहे. पतीने 25 वर्षीय पत्नीची रात्री उशिरा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर गावात खळबळ उडाली आहे. इद्रमोहन असे आरोपी पतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एसपीसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृत महिलेच्या पतीने प्रेयसीच्या मदतीने ही हत्या घडवून आणली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करत आहेत.

नातेवाईकांनी पोलिसांना दिली माहिती

इंद्रमोहन विवाहित असूनही त्याचे सहकलाकार असलेली भोजपुरी अभिनेत्री नेहा वर्मासोबत त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत. इंद्रमोहन त्याची गर्लफ्रेंड नेहा वर्मासोबत 21 डिसेंबर 2021 रोजी गोरखपूरहून खागा शहरातील आपल्या घरी आला होता. यावरून इंद्रमोहन आणि त्याची पत्नी योगमाया यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणातून रागाच्या भरात इंद्रमोहन याने पत्नी योगमाया हिचा गळा चिरून खून केला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, इंद्रमोहन आणि नेहा वर्मा गोरखपूरमध्ये भोजपुरी चित्रपटात एकत्र काम करत होते आणि हे लोक पाच दिवसांपूर्वी घरी आले होते.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले

सकाळी कुटुंबीय त्यांच्या खोलीत पोहोचले असता योगमाया रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी व त्याच्या मैत्रिणीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एसपी म्हणाले की, मृताच्या भावाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. (Bhojpuri actor kills wife over immoral relationship)

इतर बातम्या

दरवाजा तोडून बंगल्यात घुसले, 1.5 लाख रोकड, चांदीसह 15 तोळं सोनं लुटले, दरोडेखोरांचा धुमाकूळ

Anil Deshmukh : अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.