AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागडी दारू, सिगारेट, विदेशी श्वान, फार्महाऊसमध्ये स्पेशल रूम; ‘त्या’ इंजीनिअर तरुणीची हायफंडा लाईफस्टाईल थक्क करणारी

भोपाळमध्ये लोकायुक्त कार्यालयाने मोठी छापेमारी केली आहे. एका असिस्टंट इंजिनीअर असलेल्या तरुणीच्या घर आणि फार्महाऊसवर केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर घबाड सापडलं आहे.

महागडी दारू, सिगारेट, विदेशी श्वान, फार्महाऊसमध्ये स्पेशल रूम; 'त्या' इंजीनिअर तरुणीची हायफंडा लाईफस्टाईल थक्क करणारी
पगार ३० हजार, पण प्रॉपर्टी कोट्यावधींची..
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 2:05 PM

भोपाळ : मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये पोलीस हौसिंग कार्पोरेशनमध्ये असिस्टंट इंजीनिअर असलेल्या तरुणीच्या फार्म हाऊसवर काल लोकायुक्तांनी छापेमारी (Lokayukta Raid) केली. यावेळी या तरुणीच्या जवळ सात कोटीची प्रॉपर्टी (7 crores) सापडली आहे. या महिलेच्या घरी सापडलेल्या संपत्तीची मोजदाद अजूनही सुरू आहे. केवळ 30 हजार पगार असलेल्या (30 thousand salary) या तरुणीची संपत्ती पाहून अधिकारीही आश्चर्यचकीत झाले.

हेमा मीणा असं या तरुणीचं नाव आहे. या इंजीनिअर तरुणीने तिच्या फॉर्म हाऊसमध्ये एक स्पेशल रुम तयार केला होता. या रुममध्ये महागडी दारू आणि सिगारेट ठेवल्या होत्या. या तरुणीला महागड्या कारचाही शौक असल्याचं आढळून आलं. दोन ट्रकसहीत एक टँकर आणि महिंद्रा थारसह 10 वाहने या तरुणीकडे आढळून आल्या आहेत. केवळ 30 हजार रुपये पगार असतानाही या तरुणीकडे 30 लाख रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. तसेच 98 इंचाची टीव्हीही या तरुणीकडे आढळून आली आहे.

तक्रारीनंतर छापेमारी

हेमा मीणा हिच्या घर आणि फार्म हाऊसवरील छापेमारीचा हा दुसरा दिवस आहे. हेमा मीणाकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर लोकायुक्ताच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.

विदेशी श्वान आणि देशी गायी

बिलखिरिया येथील शेतात बंगला, फॉर्म हाऊस, लाखोंचे कृषी उपकरणे, परदेशी श्वान, डेयरी आदी संपत्ती तिच्याकडे आढळून आली आहे. या फार्महाऊसवर अनेक विदेशी श्वान आढळून आले आहेत. वेगवेगळ्या जातीच्या 60 ते 70 गायी ही आढळून आल्या आहेत.

पूर्वी अशी परिस्थिती नव्हती

मीणा हिच्या घरी छापेमारी झाल्याने तिच्या संपत्तीची माहितीसमोर आली आहे. त्यावर आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. यापूर्वी मीणा कुटुंबाची परिस्थिती अशी नव्हती. काही वर्षातच त्यांची आर्थिक स्थिती झपाट्याने बदलली आहे. असं काय झालं की तिची संपत्ती एवढी वाढली? असा सवाल शेजारीही करत आहे.

समितीची बैठक

मीणा हिच्याकडे 332 टक्के अधिक संपत्ती आढळली आहे. यात कृषीशी संबंधित अधिक उपकरणे आणि साहित्य आहे. तसेच आणखी तीन ठिकाणीही सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. त्या ठिकाणीही काही गोष्टी सापडल्या आहेत. यासाठी लोक निर्माण विभागाने एक बैठक बोलावली आहे. यात इमारतीचं मूल्य ठरवलं जाणार आहे.

Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.