Sadhvi Pragya | विमानात साध्वी प्रज्ञा विरोधात षडयंत्र? इमरानवर आरोप, नेमकं काय घडलं?
Sadhvi Pragya | खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी एक आरोप केलाय. विमानात आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा त्यांचा दावा आहे. एअर लाइन्सने सुद्धा त्यांच्या आरोपाची दखल घेत प्रतिक्रिया दिली आहे.
Sadhvi Pragya | मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा चर्चेत आहेत. विमानात त्यांच्यासोबत एक वादाची घटना घडलीय. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी विमानात आपल्या विरोधात कारस्थान रचल्याचा आरोप केला. त्यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेयर केलीय. अकासा एयरच्या विमानाने मी मुंबईवरुन दिल्लीला येत होते. त्यावेळी ड्युटी मॅनेजर इमरान आणि त्याच्या साथीदारांनी कारस्थान रचून माझ नुकसान करण्याचा प्रयत्न केला.
या पोस्टमध्ये साध्वी प्रज्ञा यांनी केंद्रीय नागरी उड्डायाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि अकासा एयरलाइनला टॅग केलय. त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली. “मी अकासा एयरलाइन्सच्या फ्लाइट नंबर QP1120 विमानाने मुंबईहून दिल्लीला आली. त्यावेळी तिथे असणारा ड्यूटी मॅनेजर इमरान आणि त्याच्या साथीदारांनी मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कारवाई कराल, अशी मी अपेक्षा करते, जय श्री राम” असं साध्वी प्रज्ञा यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलय.
अकासा एयरने काय म्हटलय?
साध्वी प्रज्ञा यांच्या टि्वटवर अकासा एयरने प्रतिक्रिया दिली आहे. एअरलाइन्सने म्हटलय की, “तुमच्या अनुभवाने आम्ही चिंतित आहोत. तुमच्या फिडबॅकचा रिव्यू करुन आम्ही टीमसोबत शेअर करु. आवश्यक कारवाई केली जाईल”
मा.उड्डयन मंत्री श्री @JM_Scindia जी मुंबई से दिल्ली @AkasaAir फ्लाइट नंबर QP1120 से दिल्ली आने पर ड्यूटी मैनेजर इमरान और उसके साथियों द्वारा षड्यंत्र कर मुझे बड़ी हानि पहुंचाने का प्रयास किया।अपेक्षा करती हूं आप कार्यवाही अवश्य करेंगे। जय श्री राम
— Sadhvi Pragya Singh Thakur (@sadhvipragyag) February 15, 2024
त्यावेळी सुद्धा असाच वाद झालेला
याआधी वर्ष 2019 मध्ये साध्वी प्रज्ञा यांचा विमानात वाद झाला होता. त्यावेळी दिल्ली ते भोपाळ फ्लाइटमध्ये प्रज्ञा ठाकूर यांना सीटच्या नादात प्रवाशांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 21 डिसेंबर 2019 रोजी दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या फ्लाइटमध्ये मनासारखी सीट मिळाली नाही, म्हणून प्रज्ञा ठाकूरचा क्रू शी वाद झाला होता. सीटसाठी त्या विमानातच धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. त्यावेळी विमानातील सह प्रवाशांनी त्यांच्या कृतीवर संताप व्यक्त केला होता.