अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा झटका
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीच्या कारवाई विरोधात केजरीवाल यांच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यांना धक्का दिला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. गुरुवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. शुक्रवारी त्यांना कोर्टात हजर केल्याने कोर्टाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली. या निर्णयाच्या विरोधात आणि त्यांच्या अटकेच्या विरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर तातडीने सुनावणी व्हावी, अशी त्यांची मागणी होती. केजरीवाल यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, त्यांची अटक आणि रिमांड हे दोन्ही आदेश बेकायदेशीर आहेत, त्यांची तात्काळ कोठडीतून सुटका करण्यात यावी. दिल्ली उच्च न्यायालयाने ही आव्हान देणारी याचिका तात्काळ नाकारली आहे.
हायकोर्टाचा झटका
अरविंद केजरीवाल यांच्या या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी मागमी केली होती. पण याला हायकोर्टाने स्पष्ट नकार दिलाय. बुधवारी हे प्रकरण पुन्हा सुरू करण्यासाठी सूचीबद्ध केले जाईल, असे सांगितले आहे. रविवारी 24 मार्च रोजी हंगामी मुख्य न्यायमूर्तींकडे तातडीने सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
सोमवारी होळीची सुट्टी आहे आणि त्यामुळे २७ मार्च (बुधवार) सुट्टीनंतर न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरू होईल आणि त्यानंतरच खटल्याची सुनावणी होईल.
अरविंद केजरीवाल ईडीच्या ताब्यात आहेत. पण त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण ईडीच्या कस्टडीनंतर सीबीआय त्यांची कस्टडी घेऊ शकते. त्यामुळे काही दिवस त्यांना ईडी किंवा सीबीआयच्या ताब्यात राहावे लागू शकते.
अनेकांना आतापर्यंत अटक
दिल्ली दारु घोटाळ्यात १०० कोटींचा गैरव्यवहार झालाचा आरोप आहे. ज्यामध्ये अनेक मोठ्या लोकांची नाव पुढे आली आहे. या प्रकरणात केजरीवाल यांचा काही संबंध आहे का याची चौकशी सुरु आहे.
अरविंद केजरीवाल हे दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाचे महत्त्वाचे सूत्रधार असल्याचे आपल्या रिमांड अर्जाच्या सुनावणीदरम्यान ईडीने न्यायालयात युक्तिवाद केला होता. केजरीवाल हे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि तेलंगणाच्या नेत्या कविता यांच्या संपर्कात असल्याचा दावाही ईडीने केला आहे. या प्रकरणी या लोकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.