दिवाळीच्या आधी ICICI आणि BOI बँकेचा कर्ज घेतलेल्या ग्राहकांना मोठा झटका
EMI will Increase : ICICI बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांनी आपला MCLR वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बँकांचे हे दर 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. त्यामुळे होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोन घेतलेल्या लोकांचा EMI वाढणार आहे.
मुंबई : खाजगी क्षेत्रातील बँक ICICI आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक बँक ऑफ इंडिया (BOI) यांनी MCLR वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बँकांचे हे दर 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. गेल्या महिन्यात आरबीआयच्या चलनविषयक समितीच्या बैठकीनंतर बँकांनी हे पाऊल उचलले आहे. गेल्या बैठकीत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, दरांमध्ये आणखी वाढ होण्यास अजून वाव आहे.
आयसीआयसीआय बँककडून MCLR मध्ये वाढ
MCLR मध्ये सुधारणा केल्यानंतर, ICICI बँकेचा एक महिन्याचा MCLR आता 8.50 टक्के आहे. 3 महिन्यांचा MCLR सध्या अनुक्रमे 8.55 टक्के आणि 6 महिन्यांचा दर 8.90 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR 9 टक्के आहे.
MCLR वाढल्यानंतर, बँक ऑफ इंडियाचा एक महिन्याचा MCLR अनुक्रमे 7.95 टक्के आणि 8.20 टक्के आहे. तीन महिन्यांचा MCLR आता 8.35 टक्के आणि सहा महिन्यांचा MCLR 8.55 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR 8.75 टक्के आहे, तर तीन वर्षांचा MCLR 8.95 टक्के आहे.
1 एप्रिल 2016 रोजी लागू झाला MCLR
RBI द्वारे MCLR 1 एप्रिल 2016 रोजी लागू करण्यात आला. हा किमान कर्ज दर आहे ज्याच्या खाली कोणत्याही बँकेला कर्ज देण्याची परवानगी नाही. ठेवी दर, रेपो दर, परिचालन खर्च आणि रोख राखीव प्रमाण राखण्याची किंमत यासह MCLR ठरवताना विविध घटक विचारात घेतले जातात. रेपो रेट बदलांचा MCLR दरावर परिणाम होतो. MCLR मधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात, ज्यामुळे कर्जदारांचा EMI वाढतो.
वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा EMI वाढणार
MCLR मधील वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर दिसून येईल. कर्ज घेतलेल्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना महागडे कर्ज मिळेल.