प्रियांका गांधी यांच्या पीए विरोधात गंभीर गुन्हा दाखल: बिग बॉसफेम अभिनेत्रीने केला आरोप…
गौतम बुद्ध यांनी सांगितले की, त्यांची मुलगी अर्चना गौतम बऱ्याच दिवसांपासून प्रियंका गांधी वाड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती, पण संदीप सिंह त्यांना भेटू देत नव्हते.
नवी दिल्लीः ‘बिग बॉस 16’ ची टॉप-5 फायनलिस्ट असलेल्या अर्चना गौतमच्या वडिलांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पीए संदीप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणी मेरठमधील परतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध यांनी आरोप केला आहे की संदीप सिंहने आपल्या मुलीला केवळ जातीवाचक शब्द उच्चारले नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. मेरठ पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी कलम 504, 506 आणि एससी एसटी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
गौतम बुद्ध यांनी सांगितले की, त्यांची मुलगी अर्चना गौतम बऱ्याच दिवसांपासून प्रियांका गांधी वाड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती, पण संदीप सिंह त्यांना भेटू देत नव्हते.
त्यावेळी ते म्हणाले की, अर्चना गौतम यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी प्रियांकागांधी यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी संदीप सिंह यांनी रायपूर छत्तीसगडला बोलावले होते. अर्चना गौतमने प्रियांका गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती पण पीए संदीप सिंग यांनी भेट घेण्यास नकार दिला.
अर्चना गौतमच्या वडिलांचा आरोप आहे की संदीप सिंहने आपल्या मुलीसोबत गैरवर्तनही केले आहे. तर त्यांचे अपहरण करण्याची त्यांना धमकी देण्यात आल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणानंतर अर्चना गौतमनी फेसबुकवर लाईव्ह करत तिने संदीप सिंहवर अनेक आरोपही केले होते. अर्चना गौतम म्हणाली होती की, संदीपने तिला तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली होती.
त्यानंतर अर्चनाच्या वडिलांनीही मुलीच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षिततेची मागणी केली होती. फेसबुक लाइव्हमध्ये अर्चना गौतम यांनीही संदीप सिंह यांच्यावर संपूर्ण काँग्रेस पक्ष नाराज असल्याचे सांगितले होते. संदीप सिंग प्रियांका गांधींपासून सर्व काही लपवून ठेवतात आणि कोणालाही भेटू देत नाहीत असाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.