Bihar Election Result : निकालाआधीच पोस्टर झळकण्यास सुरुवात, तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख

निकालांच्या आधीच राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री घोषित करत पोस्टर्समधून शुभेच्छा दिल्या आहेत.

Bihar Election Result : निकालाआधीच पोस्टर झळकण्यास सुरुवात, तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 7:45 AM

पाटणाः बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Results 2020) लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून, अख्ख्या देशाचं या निवडणुकीकडे लक्ष आहे. अशात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पाटणाच्या रस्त्यावर शुभेच्छांचे पोस्टर्स झळकले आहेत. यावेळी निकालांच्या आधीच राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री घोषित करत पोस्टर्समधून शुभेच्छा दिल्या आहेत. (bihar assembly election 2020 tejashwi yadav declare bihar cm before result birthday posters viral)

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची मंगळवारी म्हणजेच आज मतमोजणी होणार असून, मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. तसेच निकालाचा कल सकाळी 10 च्या सुमारास येण्यास सुरुवात होईल. या सगळ्यात निकालाच्या दिवशी अतिउत्साहात कोणत्याही प्रकारची गडबड करू नये, अशा सूचना तेजस्वी यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यासंबंधी त्यांनी एक ट्वीटदेखील केलं आहे. यात त्यांनी लिहलं की, ‘आरजेडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा, 10 नोव्हेंबरला निवडणुका निकाल काहीही असला तरी, तो पूर्ण संयम, साधेपणा आणि सौजन्याने स्वीकारला जाणं आवश्यक आहे. फटाकेबाजी, आनंदात गोळीबार करणं, प्रतिस्पर्धी किंवा त्यांच्या समर्थकांशी असभ्य वर्तन करणं कोणत्याही किंमतीत स्वीकारलं जाणार नाही.’

याचप्रमाणे आरजेडीनेही एक ट्वीट केलं आहे. ‘तेजस्वी यादव यांनी त्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरे करण्याच्या निर्णय घेतला आहे. याचा आदर करत सर्व हितचिंतक आणि समर्थकांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, 10 तारखेला मतमोजणीसाठी क्षेत्रात जागरूक रहा.’ पण पक्षाच्या या सूचनेनंतरही तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी हजेरी लावून वाढदिवसानिमित्त मोठी गर्दी केली यावेळी. (bihar assembly election 2020 tejashwi yadav declare bihar cm before result birthday posters viral)

दरम्यान, एक्झिट पोलमध्ये बहुतेक वाहिन्यांनी महाआघाडीचा विजय होईल, असा अंदाज वर्तविला आहे. या महाआघाडीत राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. महाआघाडीला आपलाच विजय होणार, असा विश्वास आहे, तर दुसरीकडे नितीशकुमारांनाही बिहारमध्ये पुन्हा त्यांचंच सरकार येईल, अशी आशा आहे. मतमोजणीसाठी स्ट्राँग रुमपासून मतमोजणी केंद्रांपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूला फटाके फोडण्यास आणि रंग-गुलाल उधळण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत.

एक्झिट पोलमधील राजकीय तज्ज्ञांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरल्यास तेजस्वी यादव हे बिहारचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून समोर येतील. यापूर्वी वयाच्या 32व्या वर्षी देशातील कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री झालेला नाही. मतपेटीत अनेक उमेदवारांचे भवितव्य कैद झालेला असून, मंगळवारी होत असलेल्या मतमोजणीमुळे अनेक मंत्र्यांचे भवितव्य निश्चित होणार आहे. या मंत्र्यांमध्ये नंदकिशोर यादव (पाटणा साहिब), प्रमोद कुमार (मोतिहारी), राणा रणधीर (मधुबन), सुरेश शर्मा (मुजफ्फरपूर), श्रवण कुमार (नालंदा), जय कुमार सिंह (दिनारा) आणि कृष्णनंदन प्रसाद वर्मा (जहानाबाद) अशी नावे आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या आहेत. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर रोजी 243 जागांसाठी मतदान झाले.

इतर बातम्या –

5 पोलमधून बिहारमध्ये सत्तांतराचे भाकित, उद्या सकाळी 7 वाजेपासून TV9 वर महाकव्हरेज

Bihar Election Result : बिहारमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी, सर्वात आधी ‘या’ जागेवरचा निकाल येणार

(bihar assembly election 2020 tejashwi yadav declare bihar cm before result birthday posters viral)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.