Nitish Kumar Oath LIVE | नितीश कुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस हे पाटण्यात दाखल झाले
पाटणा : जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटण्यातील राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीशकुमारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जेडीयूचे 6, भाजपचे 5, तर ‘हम’ आणि व्हीआयपी पक्षाचे प्रत्येकी एक आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस हे पाटण्यात दाखल झाले. (Bihar CM Nitish Kumar Oath Ceremony Live Update)
बिहारमध्ये सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या एनडीएमध्ये भाजप आणि जेडीयू यांच्यासोबत हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) हे दोन पक्षही आहेत. चार मित्रपक्षांमध्ये मंत्रिपदांच्या वाटणीसाठी सूत्र निश्चित झाले आहे. साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद या फॉर्म्युलाने चारही पक्षांचे चेहरे मंत्रिमंडळात असतील. विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
[svt-event title=”नितीश कुमार यांचा शपथविधी” date=”16/11/2020,4:41PM” class=”svt-cd-green” ]
महत्त्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/f9G6ybU1zC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 16, 2020
[/svt-event]
[svt-event title=”शाह-फडणवीस पाटण्यातील भाजप कार्यालयात” date=”16/11/2020,3:30PM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस पाटण्यातील भाजप कार्यालयात दाखल झाले [/svt-event]
[svt-event title=”नितीश कुमार यांचा शपथविधी पाहा लाईव्ह” date=”16/11/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
(Bihar CM Nitish Kumar Oath Ceremony Live Update)
नितीश कुमार यांच्यासोबत कोणाचा शपथविधी
जेडीयू
- विजय चौधरी
- विजेंद्र यादव
- अशोक चौधरी
- मेवालाल चौधरी
- शीला मंडल
भाजप
- तारकिशोर प्रसाद
- रेणुदेवी
- अमरेंद्र प्रताप सिंह
- मंगल पाण्डेय
- रामसूरत राय
- रामप्रीत पासवान
- जीवेश मिश्रा
हम
1. संतोष मांझी
वीआयपी
1. मुकेश सहनी
मंत्रिमंडळात किती मंत्री असणार?
243 सदस्यांच्या विधानसभेत संविधानिक प्रावधानानुसार 15 टक्के सदस्यांना मंत्रिपद देता येऊ शकते. त्यानुसार बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 36 मंत्री असतील. एनडीएनला विधानसभा निवडणुकीत 125 जागा मिळाल्या असून भाजपला सर्वाधिक म्हणजे 74 जागा आहेत. त्यापाठोपाठ जेडीयूला 43, तर हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी चार-चार जागा आहेत.
कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं?
साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जाते. त्यानुसार भाजपला सर्वाधिक म्हणजे 21 मंत्रिपदं मिळतील, तर जेडीयूच्या वाट्याला बारा मंत्रिपदं येण्याची चिन्हं आहेत. हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल. नितीश कुमार स्वतः मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार असल्याने जेडीयूतील अकरा नेत्यांना मंत्रिपदं मिळतील.
Bihar: Home Minister and BJP leader Amit Shah arrives at party office in Patna.
He is in the city to attend the swearing-in ceremony of CM designate Nitish Kumar. pic.twitter.com/yXZEnFqb4y
— ANI (@ANI) November 16, 2020
बिहारमधील पक्षीय बलाबल
भाजप – 74 जेडीयू – 43 आरजेडी – 75 काँग्रेस – 19 एमआयएम – 05 CPI (ML) – 12 CPI (अन्य) – 4 हिंदुस्तान आवाम मोर्चा – 04 विकासशील इन्सान पार्टी – 04 अपक्ष/इतर – 03 एकूण – 243
संबंधित बातम्या :
बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे 7-7 मंत्री, भाजपच्या खात्यात दोन उपमुख्यमंत्रिपदं
साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद, नितीश कुमार मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाचे किती मंत्री?
(Bihar CM Nitish Kumar Oath Ceremony Live Update)