Bihar Election Result 2020: चिराग पासवान किंगमेकर ठरणार का? मतमोजणीचा ट्रेंड बदलला, भाजपची जोरदार मुसंडी
मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित 'एनडीए'ने जोरदार कमबॅक केल्याचे चित्र आहे. | Bihar Election Result 2020
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊ आता काही तास उलटले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, असे चित्र होते. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित ‘एनडीए’ने जोरदार कमबॅक केल्याचे चित्र आहे. त्यामुळे एनडीएच्या आघाडी असलेल्या जागांची संख्या जवळपास 100 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महागठबंधन आणि एनडीएच्या संख्याबळात फारसा फरक उरलेला नाही. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ही परिस्थिती कायम राहिल्यास अपक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांना फोडून सत्ता स्थापन करण्याची संधी एनडीएला मिळू शकते. (Chirag Paswan ljp could be kingmaker in Bihar)
अशावेळी लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
यापूर्वी बहुतांश एक्झिट पोल्सनी बिहारमध्ये महागठबंधनची एकहाती सत्ता येईल, असे अंदाज वर्तविण्यात आले होते. त्यामुळे राजदच्या कार्यकर्त्यांकडून कालपासूनच सेलिब्रेशनला सुरुवात झाली होती. मात्र, आता मतमजोणीच्या काही तासानंतर महागठबंधन एकहाती जिंकणार नाही, याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण होऊ शकते. तशी वेळ आल्यास भाजपचे ‘चाणक्य’ नेते अपक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांना गळाला लावून महागठबंधनचे सत्तास्थापनेचे स्वप्न धुळीस मिळवू शकतात.
Bihar Election Counting Results Live Updates बिहार निवडणूक निकाल लाईव्ह #tv9marathilive Watch LIVE TV | https://t.co/xbpirVYcSz#BiharElection2020 pic.twitter.com/Ae8n2L7jW2
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2020
पहिल्या तासाभरातच तेजस्वी यादवांचा करिष्मा, RJD ची मुसंडी
बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुसंडी मारली आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनने पहिल्या तासाभरातच बहुमताचा आकडा गाठला. (Bihar Election Results 2020 Tejashwi Yadav ahead in first phase) हे सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
दोन तासांच्या मतमोजणीनंतर महागठबंधन 112, तर एनडीए 105 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 62 जागा मिळवत बिहारमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष होण्याच्या वाटेवर आहे.
संबंधित बातम्या:
Bihar Election Result 2020 LIVE | उत्साह शिगेला, एनडीएच्या जागा वाढल्या
(Chirag Paswan ljp could be kingmaker in Bihar)