Bihar Election Results 2020: ‘एनडीए’चा चमत्कार; बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

आता 'एनडीए'ची सत्ता आल्यास नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन भाजप पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. | Bihar Election Results 2020

Bihar Election Results 2020: 'एनडीए'चा चमत्कार; बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 11:25 AM

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. एवढेच नव्हे तर ‘एनडीए’ने राजद-काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. (Bihar Election Results 2020 NDA inches ahead after scare)

सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण 243 जागांपैकी 131 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन अवघ्या 96 जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 जागा जिंकून बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापन करेल, असे चित्र तुर्तास दिसत आहे.

तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे उमेदवार 71 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपपेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या संयुक्त जनता दलाचे (जदयू) उमेदवार 52 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप हा मोठा भाऊ होणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता ‘एनडीए’ची सत्ता आल्यास नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन भाजप पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘राजद’ने मोठी आघाडी घेतली होती. महागठबंधनने जवळपास 113 जागांपर्यंत मुसंडी मारली होती. त्यामुळे महागठबंधन सहजपणे सत्ता स्थापन करेल, असे सांगितले जात होते. मात्र, अवघ्या काही तासांत हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. सध्याच्या घडीला राजद 60 तर काँग्रेस 20 आणि डावे पक्ष 17 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे महागठबंधनची घौडदौड 100 जागांपर्यंत सिमीत राहण्याची शक्यता आहे.

चिराग पासवान किंगमेकर ठरणार का? सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, असे चित्र होते. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित ‘एनडीए’ने जोरदार कमबॅक केल्याचे चित्र आहे. सध्या ‘एनडीए’कडे बहुमताचा आकडा आहे. मात्र, नंतरच्या टप्प्यात ही आघाडी कमी झाल्यास लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result ! तेजस्वी यादवांमुळे नव्हे, कोरोनामुळे आमचा पराभव; जेडीयूचं अजब तर्कट

Bihar Election Live Update: राजदला मोठा धक्का, तेजप्रताप यादव पिछाडीवर

Bihar Election Result 2020: चिराग पासवान किंगमेकर ठरणार का? मतमोजणीचा ट्रेंड बदलला, भाजपची जोरदार मुसंडी

(Bihar Election Results 2020 NDA inches ahead after scare)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.