AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar election results: मुख्यमंत्रिपदाच्या आशेने लंडनहून बिहारला, पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघांत पिछाडीवर

बिहारच्या जनतेला पुष्पम प्रिया यांचा हा प्रचार फारसा भावलेला दिसत नाही. | Pushpam Priya Choudhary

Bihar election results: मुख्यमंत्रिपदाच्या आशेने लंडनहून बिहारला, पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघांत पिछाडीवर
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 12:26 PM

पाटणा: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत थेट एन्ट्री घेत मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी (Pushpam Priya Choudhary ) यांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पुष्पम प्रिया यांनी बांकीपूर आणि बिस्फी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून या दोन्ही मतदारसंघांमध्ये पुष्पम प्रिया पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. (Pushpam Priya Choudhary trailing from both seats)

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी पुष्पम प्रिया यांनी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी पुष्पम प्रिया चौधरी यांनी ‘प्लुरल्स’ (Plurals) हा राजकीय पक्ष स्थापन केला होता. पुष्मप प्रिया चौधरी यांनी जाहिरातीत सांगितले होते की, त्यांनी परदेशातून शिक्षण घेतलं आहे आणि आता त्या बिहारमध्ये परत येऊन बिहारचा कायापालट करु इच्छितात. मात्र, बिहारच्या जनतेला पुष्पम प्रिया यांचा हा प्रचार फारसा भावलेला दिसत नाही.

त्यामुळे बांकीपुर आणि बिस्फी या दोन्ही मतदारासंघांमध्ये पुष्पम प्रिया पिछाडीवर आहेत. यापैकी बांकीपुरमध्ये त्यांचा सामना शत्रुघ्न सिन्हा यांचे पूत्र लव सिन्हा आणि भाजपच्या नितीन नवीन यांच्याशी आहे. सध्याच्या घडीला या मतदारसंघात नितीश नवीन आघाडीवर असून लव सिन्हा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

तर बिस्फी मतदारसंघात राजद नेते फैयाद अहमद आणि भाजपचे हरिभूषण ठाकुर यांच्याविरोधात पुष्पम प्रिया उभ्या ठाकल्या होत्या. मात्र, याठिकाणीही त्यांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

लंडनमध्ये शिक्षण

पुष्पम प्रिया चौधरी या द्विपदवीधर (Double MA) आहेत. इंग्लंडच्या द इन्स्टीट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज विश्वविद्यालयातून त्यांनी एमए इन डेव्हलपमेंट स्टडीज आणि लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्समधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये एमए केलं आहे.

हा पक्ष सकारात्मक राजकारण आणि योजना बनवण्याच्या विचारधारेवर केंद्रित आहे. पुष्पम प्रिया चौधरी यांनी जाहिरातीत बिहारच्या जनतेसाठी एक पत्रही लिहिलं आहे. यामध्ये त्या म्हणाल्या, जर त्या बिहारच्या मुख्यमंत्री होतात तर 2025 पर्यंत बिहारला त्या देशातील सर्वात विकसित राज्य बनवेल आणि 2030 पर्यंत बिहार युरोपियन देशांसारखं असेल. त्यांनी निवडणुकांमध्ये बिहारच्या जनतेचा पाठिंबा मागितला आहे.

पुष्पम प्रिया चौधरी या दरभंगा येथील राहणाऱ्या आहेत. त्या (Bihar Politics) जेडीयूच्या माजी विधान परिषद सदस्य विनोद चौधरी यांची मुलगी आहे. त्या सध्या लंडन येथे राहतात.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020: चिराग पासवान किंगमेकर ठरणार का? मतमोजणीचा ट्रेंड बदलला, भाजपची जोरदार मुसंडी

Bihar Election Results 2020: ‘एनडीए’चा चमत्कार; बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

(Pushpam Priya Choudhary trailing from both seats)

प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....