VIDEO: पाच वर्षांत पाचव्यांदा बिहार पोलिसांनी दारूबंदीची शपथ घेतली!, यावेळी अंमलबजावणी होणार?
दारूबंदीचे पालन करण्यासाठी स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र देखील अधिकार्यांनी सादर केले. सुमारे 9 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली, ज्यात शाळेतील शिक्षक आणि पोलीस कर्मांना त्यांच्या संबंधित कार्यालयात शपथ देण्यात आली.
पटनाः बिहार सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आज आजीवन दारूपासून दूर राहण्याची सामूहिक शपथ दिली गेली. बिहार पोलिसांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची शपथ घेतली. गेल्या पाच वर्षांत ही पाचवी वेळ आहे बिहार सरकारने राज्यात दारूबंदी लागू करण्याची सामूहिक शपथ घेतली! नितीश कुमार सरकारने 2016 मध्ये बिहारमध्ये दारूबंदी लागू केली, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात ते असमर्थ ठरले.
सुमारे 9 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली, ज्यात शाळेतील शिक्षक आणि पोलीस कर्मांना त्यांच्या संबंधित कार्यालयात शपथ देण्यात आली. हा शपथविधी आज, 26 नोव्हेंबरला बिहार दारूबंदी दिनानिमित्त देण्यात आली. दारूबंदीचे पालन करण्यासाठी स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र देखील अधिकार्यांनी सादर केले.
We’ll implement the ban with all our efforts. It’s also being seen that people are moving towards drugs. So, all of us in the Police dept are committed to implementing the ban. If any Police personnel is found to be involved,their services will be terminated: Bihar DGP SK Singhal pic.twitter.com/CUU9Mu6WM0
— ANI (@ANI) November 26, 2021
बिहार सरकारी कर्मचार्यांना अशी शपथ देण्याची आणि हमी देण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ नाही. नितीश यांनी एप्रिल 2016 मध्ये कायदा आणून दारूबंदी लागू केल्यापासून ही पाचवी वेळ आहे. मात्र, यावेळी फरक असा आहे की मरेपर्यंत कधीही मद्यपान करणार नाही किंवा संबंधित कार्यात सहभागी होणार नाही, असं शपथेमध्ये समावेश आहे. स्वाक्षरी केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर संबंधित कार्यालयाचे प्रमुख किंवा प्रभारी शिक्का मारतील आणि रेकॉर्ड म्हणून ठेवले.
अनेकांना प्रश्न पडले आहेत की या शपथेमुळे बिहार राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारी तस्करी, उत्पादन, व्यापार आणि अवैध दारूच्या सेवनाला आळा घालण्यात मदत कशी होणार आहे? जेव्हा याचा पूर्वी कोणत्याही शरथेचा परिणाम झालेला नाही. वारंवार शपथ घेण्याची गरज पडते, हा पुरावा आहे की दारूबंदी अपयशी ठरत आहे.
नितीश कुमार सरकार दबावाखाली
अलीकडे बिहारमध्ये विषारी आणि बनावट दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला, त्यानंतर नितीश कुमार सरकारवर विरोधकांचा दबावाखाली आहे. बिहारमधील दारूबंदीला सुरुवातीला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता, पण आता मित्रपक्ष भाजपसह विरोधी पक्ष दारूबंदी मागे घेण्याची मागणी करत आहे. भाजपच्या दोन आमदारांनी समाजावर “हानीकारक परिणाम” झाल्यामुळे दारूबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे.
इतर बातम्या-