Bihar school wall collapse : बिहारमध्ये सरकारी शाळेची भिंत कोसळली, आतापर्यंत 6 मृतदेह हाती

बिहारच्या खगडिया जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे (Bihar school wall collapse). एका सरकारी शाळेची भींत कोसळल्याने अनेक मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Bihar school wall collapse : बिहारमध्ये सरकारी शाळेची भिंत कोसळली, आतापर्यंत 6 मृतदेह हाती
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 7:48 PM

लखनऊ : बिहारच्या खगडिया जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे (Bihar school wall collapse). एका सरकारी शाळेची भींत कोसळल्याने अनेक मजुरांचा मृत्यू झाला आहे. यापैकी आतापर्यंत सहा मजुरांचे मृतदेह मिळाले आहेत. या दुर्घटनेत अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खगडिया जिल्ह्यातील महेशखुंट पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या चंडी टोल परिसरात घडली. चंडी टोला प्राथमिक शाळेजवळ नाला बनवायचं काम सुरु होतं. त्यासाठी जेसीबीने खोदकाम सुरु होतं. या दरम्यान, शाळेची 50 फूट उंच भींत कोसळली. यावेळी भींतीजवळ काही मजूर बसले होते. ते सर्व मजूर या दुर्घटनेचे बळी ठरले. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली (Bihar school wall collapse).

तीन जण अजूनही मलब्याखाली अडकले

भींत कोसळली तेव्हा काही लोक त्या भींतीजवळ बसले होते. ते सर्व मजूरच आहेत, असा स्थानिकांचा अंदाज आहे. ते नाला बनवण्याचं काम करत होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने प्रशासनाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थली दाखल झाली. कोसळलेल्या भींतीच्या मलब्याखालून आतापर्यंत सहा मृतदेह मिळाले आहेत. अजूनही शोध कार्य सुरु आहे. मलब्याखाली आणखी तीन मजूर अडकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

भींत गेल्यावर्षीच तयार केली

संबंधित भींत गेल्यावर्षी उभारण्यात आली होती. आमदार पन्नालाल सिंह पटेल यांच्या हस्ते या भींतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. बिहार सरकारच्या नल जल योजना अंतर्गत हे काम करण्यात आलं होतं.

स्थानिकांचे निदर्शने 

या दुर्घटनेनंत स्थानिकांना प्रशासनाला दोषी म्हणत आंदोलन केले. त्यांनी प्रशासनाविरोधात निदर्शने दिली. दरम्यान, घटनास्थळी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारी देखील दाखल झाले. मात्र, परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.