Bihar terror module : मोदींचा बिहार दौरा निशाण्यावर, बिहारमध्ये दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश; निवृत्त इन्स्पेक्टर जेरबंद

Bihar terror module : परवेज आणि मोहम्मद दोघेही एनजीओच्या नावाखाली दहशतवाद्यांची फॅक्ट्रीच चालवत होते असं सांगितलं जातं. हिंदुंच्या विरोधात मुस्लिमांना भडकावणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. मुस्लिम तरुणांना हे दोघेही शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत होते.

Bihar terror module : मोदींचा बिहार दौरा निशाण्यावर, बिहारमध्ये दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश; निवृत्त इन्स्पेक्टर जेरबंद
मोदींचा बिहार दौरा निशाण्यावर, बिहारमध्ये दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश; निवृत्त इन्स्पेक्टर जेरबंदImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 3:05 PM

पटना: पटनाच्या फुलवारी शरीफ परिसरात एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांचा बिहार (bihar ) दौरा या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होता. मोदी 12 जुलै रोजी पटना येथे येणार होते. हा हल्ला घडवून आणण्यासाठी मोदी यांच्या दौऱ्याच्या 15 दिवस आधीच फुलवारी शरीफ येथे संशयित दहशतवाद्यांना ट्रेनिंगही दिली जात होती. त्याच ठिकाणी छापा मारून संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेणायत आलं आहे. पोलिसांनी (police) याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. मोहम्मद जलालुद्दीन असं या झारखंड पोलीसमधून निवृत्त झालेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. तर दुसऱ्याचं नाव अतहर परवेज आहे. पटना येथील गांधी मैदानात बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या मंजरचा परवेज सख्खा भाऊ आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी सुरू केली आहे.

अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित दहशतवादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित आहेत. पोलीसांनी या दोघांकडून पीएफआयचा झेंडा, बुकलेट, पत्रकं आणि बरीच संशयित कागदपत्रे जप्त केली आहे. यात भारताला 2047मध्ये इस्लामिक देश बनविण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

एनजीओच्या नावाखाली

हे दोन्ही संशयित दहशतवादी गेल्या काही काळापासून पटना फुलवारी शरीफ येथे दहशतावाद्यांची कॅम्प चालवत होते. अतहर परवेज मार्शल आर्ट आणि शारीरिक शिक्षणाचे धडे देत होता. तर मोहम्मद जलालुलद्दीन एक एनजीओ चालवत होता. मिळालेल्या माहितीनुसार अतहरने मोहम्मद जलालुद्दीन राहत असलेल्या फुलवारीशरीफ येथे एक पॅलेस खरेदी केला होता. नव्या टोला परिसरात फ्लॅट खरेदी केला होता. त्यासाठी 16000 रुपये भाडे देत होता. इथूनच तो देशविरोधी कारवाया करत होता.

तरुणांना ट्रेनिंग

परवेज आणि मोहम्मद दोघेही एनजीओच्या नावाखाली दहशतवाद्यांची फॅक्ट्रीच चालवत होते असं सांगितलं जातं. हिंदुंच्या विरोधात मुस्लिमांना भडकावणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. मुस्लिम तरुणांना हे दोघेही शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तर, राज्य स्तर आणि जिल्हा स्तरावरील पीएफआय आणि एसडीपीआयच्या सक्रिय सदस्यांसोबत त्यांच्या बैठका व्हायच्या. सिमीच्या तुरुंगात बंद असलेल्या जुन्या सदस्यांचे दोघेही जामीन करायचे आणि दहशतवादी ट्रेनिंगही द्यायचे.

अनेक तरुणांना बोलावलं

पोलिसांच्या माहितीनुसार, 6 आणि 7 जुलै रोजी अतहर परवेजने भाड्याने एक कार्यालय घेतले होते. तिथे तरुणांना मार्शल आर्ट आणि शारीरिक शिक्षणाचे धडे देण्याच्या नावाखाली बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर या तरुणांना शस्त्र चालवण्याची ट्रेनिंग दिली जात असे. नंतर या तरुणांची माथी भडकावली जात होती. याबाबतची माहिती आयबीला मिळाली होती. त्यानंतर आयबीने 11 जुलै रोजी नया टोल नाका परिसरात पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी करून दोघांना ताब्यात घेतलं.

अनेक राज्यातून तरुण यायचे

केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि अनेक राज्यातून तरुण या ठिकाणी येऊन ट्रेनिंग घेत होते. या दोन्ही संशयित अतिरेक्यांना पाकिस्तान, बांगलादेश आणि तुर्की सहीत अनेक इस्लामिक देशातून फंडिंग मिळत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.