बिहारमध्ये एनडीएचंही ठरलं! जेडीयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार

एनडीएच्या जागा वाटपानुसार जेडीयू बिहार विधानसभेसाठी ११५ तर भाजप ११२ जागा लढवणार आहे. जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

बिहारमध्ये एनडीएचंही ठरलं! जेडीयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 5:55 PM

पाटणा: राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीपाठोपाठ एनडीएनेही जागा वाटपावर शिक्कामोर्तब केलं आहे. एनडीएच्या जागा वाटपानुसार जेडीयू बिहार विधानसभेसाठी 122 तर भाजप 121 जागा लढवणार आहे. जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. (Bihar polls: BJP gets 121 seats, JD(U) 122)

एनडीएने बिहारमधील काही पक्षांनाही सोबत घेतलं आहे. भाजपने त्यांच्या कोट्यातील 9 जागा मुकेश सहनी यांच्या व्हीआयपी पार्टीला, तर जेडीयूने जीतनराम मांझी यांच्या एचएएम पक्षाला 7 जागा सोडल्या आहेत. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते. दरम्यान, एनडीए आघाडीतून रामविलास पासवान यांचा लोजपा पक्ष बाहेर पडल्याने त्याचा फायदा महाआघाडीला होणार असल्याचं बोललं जातं आहे. पासवान यांनी बिहारमध्ये 143 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. रामविलास पासवान दलित नेते असल्याने तेच एनडीएतून बाहेर पडल्याने नितीशकुमार यांनी निर्माण केलेल्या महादलित व्होटबँकेला सुरुंग लागण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहार विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेआधी काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बिहार कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि राज्य प्रभारी भूपेंद्र सिंह यादव उपस्थित होते.

जेडीयू-भाजप पुन्हा साथ साथ

2010मध्ये भाजप आणि जेडीयूने विधानसभा निवडणूक एकत्र लढली होती. त्यावेळी जेडीयूने 141 जागांवर तर भाजपने 102 जागांवर उमेदवार दिले होते. या निवडणुकीत जेडीयू 115vतर भाजप 91 जागांवर विजयी झाले होते. (Bihar polls: BJP gets 121 seats, JD(U) 122)

संबंधित बातम्या:

बिहारमध्येही महाविकास आघाडीसारखंच चित्र शक्य, कट्टर विरोधक एकत्र येणार?

एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, लोजप बाहेर, भाजप आणि जेडीयूला किती जागा?

तेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट देण्याचा मेगाप्लॅन

(Bihar polls: BJP gets 121 seats, JD(U) 122)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.