बापरे! एक्सप्रेस येताना पाहून सिमेंटचे पोल पटरीवर टाकून मजदूर पळाले; एमर्जन्सी ब्रेक, प्रवाशांच्या उड्या अन्….
मजूर पळाल्यानंतर पटरीवर सिमेंटचे भले मोठे पोल पाहून आधी ड्रायव्हरची तंतरली. मात्र, त्याचवेळी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखलं आणि तात्काळ एमर्जन्सी ब्रेक लावला. त्यामुळे लोकल थांबली.
पाटणा: बिहारमध्ये (bihar) रेल्वेचा मोठा अपघात होता होता टळला आहे. दिल्लीहून मुझफ्फरपूरकडे जाणाऱ्या सप्तक्रांती एक्सप्रेसचा अपघात होता होता टळला (Rail Accident) आहे. समस्तीपूर रेल्वे डिव्हिजनच्या कुंवरपूर चिंतामनपूर रेल्वे हाल्टच्या जवळ रेल्वे पटरीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. यावेळी डझनभर मजदूर काम करत होते. त्याचवेळी सप्तक्रांती एक्सप्रेस अत्यंत वेगाने आली. हा आवाज काम करणाऱ्या मजदूर आणि ट्रॅकमॅनने ऐकला. यावेळी मजदूरांनी पटरीवर पोल ठेवले होते. तिकडून वेगाने एक्सप्रेस (express) येत होती. त्यामुळे मजुरांना हे पोल घेऊन पळता आले नाही. मजुरांनी सिमेंटचे पोल तसेच खाली टाकले आणि पळ काढला. पटरीवर सिमेंटचे भले मोठे पोल पाहून ड्रायव्हरने तात्काळ एमर्जन्सी ब्रेक दाबला आणि मोठा अपघात टळला.
मजूर पळाल्यानंतर पटरीवर सिमेंटचे भले मोठे पोल पाहून आधी ड्रायव्हरची तंतरली. मात्र, त्याचवेळी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखलं आणि तात्काळ एमर्जन्सी ब्रेक लावला. त्यामुळे लोकल थांबली. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात होता होता टळला. मात्र, हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. एमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतर ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे प्रवाशांनी बोगीतून उड्या मारायला सुरुवात केली. सुदैवाने यावेळी कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, प्रवाशांना खरी माहिती मिळताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
चिंतामनपूर रेल्वे हाल्ट पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राच्या समस्तीपूर रेल्वे डिव्हिजनच्या अंतर्गत मुझफ्फरपूर-गोरखपूर मुख्य लाइन आहे. पूर्व चंपारण जिल्ह्याच्या कुंदिया, कुंवरपूर येथे आहे.
यापूर्वीही बिहारमध्ये एक मोठा रेल्वे अपघात होता होता टळला होता. तेव्हा ट्रेनने पटरी सोडून दुसऱ्या पटरीवरून धावली होती. अनेक किलोमीटरपर्यंत ही ट्रेन गेली होती. त्यावेळी अमरनाथ एक्सप्रेसला बरौनीनंतर समस्तीपूरला जायचं होतं. मात्र, ती विद्यापतीनगरला पोहोचली होती. त्यावेळी ड्रायव्हरचं लक्ष गेलं नसतं तर मोठा अपघात टळला असता.
त्यावेळीही एका ड्रायव्हरनेच मोठा अपघात टाळला होता. रेल्वे चुकीच्या रुटवरून जात असल्याचं पाहून ड्रायव्हरने तात्काळ ट्रेन थांबवली होती. त्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले होते.