Baba bageshwar यांचं प्रवचन ऐकून मुस्लिम मुलगी रुखसानाने उचललं मोठं पाऊल
Baba bageshwar : रोशनने कसबस आपल्या कुटुंबियांना लग्नासाठी राजी केलं. पण रुखसानाचे कुटुंबीय ऐकत नव्हते. रुखसानाने सनातन धर्माचा स्वीकार करुन रोशन बरोबर ती लग्नाबद्दल बोलली.
पाटना : बाबा बागेश्वर यांच्या प्रवचनाचा एका मुस्लिम मुलीच्या मनावर, विचारांवर मोठा परिणाम झाला. तिने थेट धर्म परिवर्तनाच मोठं पाऊल उचललं. मुस्लिम मुलीने एका हिंदू मुलाबरोबर लग्न केलं. लग्नासाठी मुलीने मुस्लिम धर्म सोडून सनातन धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर आपल्या प्रियकराबरोबर लग्न केलं. मुलीच नाव रुखसाना होता. तिने आपल्या प्रेमासाठी धर्म बदलला व रुक्मिणी बनली. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.
चार वर्षांपूर्वी मुजफ्फरपूरच्या गिंजांसा येथे राहणाऱ्या नौशिन परवीन ऊर्फ रुखसानाची जयपूरमध्ये राहणाऱ्या रोशन कुंवर बरोबर ओळख झाली. दोघे शिक्षणासाठी म्हणून जयपूरला गेले होते. तिथे एकत्र कॉलेजमध्ये शिकताना रोशन आणि रुखसानाची मैत्री झाली. पुढे मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी एकत्र जगण्या-मरण्याची शपथ घेतली. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कोणाचे कुटुंबीय ऐकत नव्हते?
रोशन आणि रुखसाना दोघे आपल्या कुटुंबियांबरोबर बोलले. रोशनने कसबस आपल्या कुटुंबियांना लग्नासाठी राजी केलं. पण रुखसानाचे कुटुंबीय ऐकत नव्हते. रुखसानाने सनातन धर्माचा स्वीकार करुन रोशन बरोबर ती लग्नाबद्दल बोलली.
रुखसानाच शुद्धिकरण
लग्नाआधी रुखसानाच शुद्धीकरण करण्यात आलं. रुखसानाला रुक्मिणी बनवण्याआधी पूजाऱ्यांनी दूध, दहीसह तिला पूजा करायला लावली. तिने नारायणी नदीला साक्षी मानून सनातन धर्माचा स्वीकार केला. आयुष्यभर हिंदू धर्माचे आचारण करण्याचा संकल्प केला. धर्म बदलल्यानंतर रुखसानाने रोशनसह सात फेरे घेऊन विवाहबद्ध झाली. धर्म बदलल्यानंतर रुक्मिणीने काय सांगितलं?
रुक्मिणी बनलेल्या रुखसानाने सांगितलं की, “बाबा बागेश्वर यांच्याकडून मला हिंदू धर्म स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे प्रवचन ऐकल्यानंतर सनातन धर्म स्वीकारण्याची माझी इच्छा झाली. माझा इस्लाम धर्म होता. पण मला सनातन धर्म आधीपासून आवडायचा” रोशनने सांगितलं की, “रुखसानाने तिच्या मनाने हिंदू धर्म स्वीकारलाय. आम्ही दोघेही लग्नानंतर खूश आहोत”