बिहारमध्ये एका विचित्र स्थितीत बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बालकाला तीन हात आणि तीन पाय आहेत. बिहारमधील वैकुंठपूर येथील रेवतिथ येथील रहिवासी मोहम्मद रहीम अली यांच्या पत्नीची नुकतीच डिलिव्हरी झाली. त्यानंतर जन्मलेल्या बाळाला तीन हात आणि तीन पाय असल्याचे आढळले. या प्रकारामुळे डॉक्टरही चक्रावून गेले.
वैकुंठपूर येथील रेवतिथ निवासी मोहम्मद रहीम अली यांच्या 30 वर्षीय पत्नी रबीना खातून यांना प्रसूती वेदना सुरु झाला. कुटुंबियांनी त्यांना वैकुंठपूर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात भरती केले. त्यानंतर रबीना यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली, मात्र जन्मलेल्या बाळाची स्थिती काही विचित्र दिसून आली. या बाळाला तीन हात आणि तीन पाय होते.
सार्वजनिक आरोग्य केंद्रातील सर्जन आफताब आलम म्हणाले, एका विशिष्ट सिंड्रोममुळे या नवजात बालकाचा अॅबनॉर्मल जन्म झाला आहे. लाखात एक असे बाळ जन्मते. विशेष म्हणजे मातेची गर्भधारणेदरम्यान सोनोग्राफीदेखील करण्यात आली होती. मात्र डॉक्टरांना त्यात ही गोष्ट दिसून आली नाही.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला जन्माच्या दोन तासानंतरही मातेचे दूध पाजता आले नाही. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. बाळाला दुसऱ्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बाळाची प्रकृती नाजूक असली तरीही फार धोका नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
इतर बातम्या-