Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारांना मार्शलने उचलून, उचलून सभागृहाबाहेर नेले, मुस्लीम समाजाच्या आरक्षणावरुन वादंग, 18 जणांचे निलंबन

Karnataka Assembly MLA suspended: कर्नाटक मंत्रिमंडळाने शुक्रवारी कर्नाटक ट्रान्सपेरेंसी इन पब्लिक प्रोक्योरमेंट्स (KTPP) अधिनियमात संशोधन करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार दोन कोटीपर्यंतचे कंत्राट देण्यासाठी मुस्लीम समाजाला चार टक्के आरक्षण दिले.

आमदारांना मार्शलने उचलून, उचलून सभागृहाबाहेर नेले, मुस्लीम समाजाच्या आरक्षणावरुन वादंग, 18 जणांचे निलंबन
Karnataka Assembly MLAImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
Follow us
| Updated on: Mar 21, 2025 | 6:29 PM

Karnataka Assembly MLA suspended: कर्नाटकच्या विधानसभेत शुक्रवारी मोठा राडा झाला. कर्नाटकात सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून कर्नाटक विधानसभेत गदारोळ झाला. यानंतर कर्नाटक विधानसभेतून आज जे चित्र समोर आले ते धक्कादायक होते. भाजप आमदारांनी या चार टक्के कोट्याला विरोध केल्यानंतर मार्शल बोलवून त्यांना उचलून उचलून सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर सभागृहात आरक्षणाचे विधेयक संमत झाले. तसेच सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. भाजपच्या 18 आमदारांचे सहा महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण

कर्नाटक मंत्रिमंडळाने शुक्रवारी कर्नाटक ट्रान्सपेरेंसी इन पब्लिक प्रोक्योरमेंट्स (KTPP) अधिनियमात संशोधन करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार दोन कोटीपर्यंतचे कंत्राट देण्यासाठी मुस्लीम समाजाला चार टक्के आरक्षण दिले. या निर्णयास भारतीय जनता पक्षाने विरोध केला. पक्षाचे खासदार यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक सरकारचे हे असंवेधानिक पाऊल असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री सिद्धारमैया सरकारने हा निर्णय त्वरीत मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

या आमदारांचे निलंबन

  • डोड्डनगौडा एच. पाटील
  • डॉ. अश्वथ नारायण सी.एन.
  • एस.आर. विश्वनाथ
  • बी.ए. बसवराज
  • एम.आर. पाटील
  • चन्नबसप्पा (चन्नी)
  • बी. सुरेश गौडा
  • उमनाथ ए. कोट्यान
  • शरणु सलागर
  • डॉ. शैलेन्द्र बेलदले
  • सी.के. राममूर्ती
  • यशपाल ए. सुवर्णा
  • बी.पी. हरीश
  • डॉ. भारत शेट्टी वाई.
  • मुनीरथ्ना
  • बसवराज मट्टीमूड
  • धीरज मुनीराजु
  • डॉ. चंद्रु लामानी

आमदारांचा पगार 100 टक्के वाढला

भाजप आमदारांचा गदारोळ सुरु असताना मुख्यमंत्री, मंत्री अन् आमदारांचा पगार शंभर टक्के वाढ करण्याचे विधेयक संमत करण्यात आले. हे विधेयक कर्नाटकचे कायदा मंत्री एस.के. पाटील यांनी मांडले होते. त्यामुळे आता कर्नाटकात मुख्यमंत्र्यांचा पगार 75 हजार रुपयांवरुन 1.5 लाख रुपये महिना असा होणार आहे. तसेच विधान सभा सभापती आणि विधानसभा अध्यक्षांचे वेतन 75 हजारावरुन 1.25 लाख रुपये महिना असे होईल.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.