गुजरातमध्ये भाजप 32 जागांवर पुढे, काँग्रेसनेही खातं उघडलं; मतमोजणीला सुरुवात

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये आले होते. तसेच राज्यातील अनेक भाजपनेतेही या प्रचारात सामील झाले होते.

गुजरातमध्ये भाजप 32 जागांवर पुढे, काँग्रेसनेही खातं उघडलं; मतमोजणीला सुरुवात
गुजरातमध्ये भाजप 32 जागांवर पुढे, काँग्रेसनेही खातं उघडलं; मतमोजणीला सुरुवात Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 8:18 AM

अहमदाबाद: गुजरातमध्ये काँग्रेसने खातं उघडलं आहे. गुजरामध्ये काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजल्यापासून गुजरात विधानसभेसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच कौल येण्यास सुरु झालं आहे. त्यात भाजपने तरी बाजी मारल्याचं चित्रं आहे.

सकाळी 8 वाजता गुजरात विधानसभेसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या मतमोजणीत आपला दोन जागांवर आघाडीवर आहे. एकूण 182 जागांसाठी राज्यात मतमोजणी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात भाजपची सत्ता आहे. ही सत्ता राखण्यात भाजप पुन्हा यशस्वी ठरते की काँग्रेस बाजी मारते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या शिवाय आपनेही गुजरातमध्ये प्रवेश केल्याने आपला कितपत यश मिळतं याकडेही राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभा घेऊन संपूर्ण गुजरात पिंजून काढलं होतं. भाजप नेते अमित शहा यांच्यापासून अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारासाठी आलं होतं. या शिवाय भाजपचे अनेक राज्यातील मुख्यमंत्रीही निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये आले होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये आले होते. तसेच राज्यातील अनेक भाजपनेतेही या प्रचारात सामील झाले होते. त्या मानाने काँग्रेसचा प्रचार मंदावलेलाच होता. राहुल गांधी यांच्या दोन चार सभांचा अपवाद वगळता गुजरातमध्ये काँग्रेसचा फारसा प्रचार दिसला नव्हता.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.