भाजपने 6 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर, नौशेरामधून निवडणूक लढवणार रैना

J&K Assembly Elections: भारतीय जनता पक्षाने सोमवारी आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. काँग्रेसने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

भाजपने 6 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर, नौशेरामधून निवडणूक लढवणार रैना
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 9:30 PM

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 साठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीये. या यादीत 6  उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या यादीनुसार, जम्मू-काश्मीर भाजपचे प्रमुख रविंदर रैना नौशेरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर पक्षाने लाल चौकातून ऐजाज हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. राजौरीतून पक्षाने विबोध गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.

संपूर्ण यादी पहा

लाल चौक – एजाज हुसेन ईदगाह – आरिफ राजा खानसाहेब – डॉ. अली मोहम्मद मीर चरार शरीफ – जाहिद हुसेन नौशेरा – रविंदर रैना राजौरी – विबोध गुप्ता

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत

जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. त्यानंतर ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील यादी जाहीर केली आहे. पक्षाने प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांना श्रीनगरच्या सेंट्रल शाल्टेंग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर श्री माता वैष्णोदेवी येथून भूपिंदर जामवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रियासीमधून मुमताज खान, राजौरीतून इफ्तिखार अहमद, थानामंडीमधून शाबीर अहमद खान आणि सुरणकोटमधून मोहम्मद शाहनवाज चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

29 ऑगस्ट रोजी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली होती.  ज्यामध्ये त्यांनी सुरिंदर सिंग चन्नी (त्राल), अमानुल्लाह मंटू (देवसर), नदीम शरीफ (भदरवाह), शेख रियाझ (डोडा), पीरजादा मोहम्मद सय्यद (अनंतनाग), शेख जफरउल्लाह (इंदरवाल) आणि डॉ प्रदीप कुमार भगत (डोडा पश्चिम) यांना उमेदवारी दिली आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी झाली असून, राज्यातील 90 जागांपैकी काँग्रेस 32 जागांवर निवडणूक लढवणार आहे तर नॅशनल कॉन्फरन्स 51 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. बनिहाल, दोडा, भदरवाह, नागरोटा आणि सोपोर या पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.