TMC खासदाराकडून उपराष्ट्रपतींची नक्कल, राहुल गांधी काढत होते VIDEO; भाजपकडून टीका

| Updated on: Dec 19, 2023 | 3:06 PM

राज्यसभा आणि लोकसभेत विरोधी पक्षाच्या १४१ खासदारांचं निलंबन झाले आहे. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी याचा निषेध करत असताना विरोधी पक्षातील टीएमसीचे खासदार उपराष्ट्रपतींची नक्कल करताना दिसले. यावर भाजपने टीका केली आहे.

TMC खासदाराकडून उपराष्ट्रपतींची नक्कल, राहुल गांधी काढत होते VIDEO; भाजपकडून टीका
rahul gandhi
Follow us on

नवी दिल्ली :  संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातल्यामुळे अनेक विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर विरोधी पक्षाने संसद परिसरात याचा निषेध केला. यादरम्यान तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी हे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची नक्कल करत होते. संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबित करण्यात आलेले विरोधी पक्षाचे खासदार देखील या वेळी उपस्थित होते. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांची नक्कल केल्याचा व्हिडिओ आता पुढे आला आहे. यावर भाजपने टीका केली आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांची खिल्ली उडवल्याचा प्रयत्न हा हे लज्जास्पद, हास्यास्पद, अस्वीकार्य आहे.” अशी टीका भाजपने केली आहे.

भाजपकडून टीका

भाजपने बॅनर्जी आणि राहुल गांधी या दोघांवर उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवल्याने टीका केली आहे. “विरोधक खासदारांना निलंबित का करण्यात आले याचा विचार जर देशाला वाटत असेल, तर त्याचे कारण हे आहे,” असे भाजपने लिहिले आहे, “त्यांनी सभागृहाकडे किती निष्काळजीपणा आणि उल्लंघन केले आहे याची कल्पना येऊ शकते!”

राहुल गांधी यांच्यावर टीका

तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांचा मिमिक्री व्हिडिओ भाजप नेते संबित पात्रा यांनी शेअर करत टीका केली आहे. त्यांनी लिहिले, देश लक्षात ठेवेल… जेव्हा देशाचे उपराष्ट्रपती आणि संवैधानिक संस्थेची खिल्ली उडवली जात होती, तेव्हा शहजादा उभा राहून व्हिडिओ बनवत होता. भारत तोडणाऱ्यांना पाठीशी घालून भारताला जोडण्याचे नाटक करणाऱ्यांचा मुख्य अजेंडा संघटित करण्याचा नसून तोडण्याचा आहे. देशातील जनता 2024 मध्ये अहंकारी लोकांचा अहंकार नक्कीच संपवतील.

तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जगदीप धनखड यांची नक्कल केल्याबद्दल केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, “I.N.D.I आघाडीच्या खासदारांनी शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत! राहुल गांधी आणि उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या अध्यक्षांचा अहंकार आणि अपमान केला आहे.