Ram Mandir | भाजपावाले प्रभूरामाबद्दल बोलतात, पण सीता मातेच काय? देशातील मोठ्या महिला नेत्याचा सवाल
Ram Mandir | "भाजपा प्रभूरामांबद्दल बोलते, पण सीता मातेच काय?. राम वनवासात असताना त्या प्रभू रामचंद्रांसोबत होत्या" याकडे देशातील एका मोठ्या महिला नेत्याने लक्ष वेधलं. अयोध्येत काल भव्य राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. आजपासून राम मंदिर भाविकांसाठी खुल झालय.
Ram Mandir | अयोध्येत काम भव्य राम मंदिराच उद्घाटन झालं. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला. याकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं होतं. 500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर प्रभू रामचंद्र आपल्या गर्भगृहात विराजमान झाले. या कार्यक्रलाला देशाचे प्रधानसेवक या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. हा कार्यक्रम होण्यापूर्वी आणि कार्यक्रमानंतर राजकीय टीकाटिप्पणी सुरु आहे. “लोकसभा निवडणुकीआधी भाजपाने या धार्मिक कार्यक्रमाच राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केला तसेच भाजपा महिला विरोधी पार्टी आहे” असा आरोप देशातील एका प्रमुख महिला नेत्याने केला आहे. सोमवारी झालेल्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला या महिला नेत्या अनुपस्थित राहिल्या. भाषणात प्रभूरामाबद्दल बोलताना सीतेला वगळल्याबद्दल त्यांनी भाजपावर टीका केली. या महिला नेत्या त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या सनहाती रॅलीला उपस्थित होत्या. आम्ही बोलतोय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल.
“भाजपा प्रभूरामांबद्दल बोलते, पण सीता मातेच काय?. राम वनवासात असताना त्या प्रभू रामचंद्रांसोबत होत्या. ते महिला विरोधी असल्यामुळे सीता मातेबद्दल बोलत नाहीत. आम्ही दुर्गामातेचे भक्त आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला धर्माबद्दल शिकवू नये” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. “निवडणुकीच्याआधी धर्माच राजकारण मला पटत नाही. मी अशा गोष्टींच्या विरोधात आहे. जे प्रभूरामांचे भक्त आहेत, त्यांना माझा विरोध नाही” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी
अयोध्येत काल राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य यजमान होते. देशभरातून 8 हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यात चित्रपट, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर होते. आजपासून राम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुल झालं आहे. पहिल्यादिवशी प्रभू रामांच्या दर्शनासाठी अयोध्येत मोठी गर्दी उसळली आहे.