पोलिसांनी शेतकऱ्याला मारणं सोडा स्पर्शही न केल्याचा भाजप आयटी सेलचा दावा, ट्विटरकडून अमित मालवीय यांचं ट्विट ‘फ्लॅग’
भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांचा आंदोलनात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नसल्याचा दावा ट्विटरने खोटा ठरवत फ्लॅग केला आहे. यामुळे भाजपची नाचक्की झालीय.
नवी दिल्ली : देशभरातील संघटनांनी मोदी सरकारच्या नव्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) ‘दिल्ली चलो’चा नारा देत मोठं आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्ज अशा प्रकारच्या कारवाया देखील झाल्या. याविरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. मात्र, त्यातच भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी आंदोलनात शेतकऱ्यांना मारणं तर सोडा, पण लाठीचा स्पर्शही झाला नसल्याचा दावा करणारं ट्विट करण्यात आलं. यात एक व्हिडीओ जोडण्यात आला होता. हे ट्विट खोटा दावा करत असून चुकीची माहिती पसरवत असल्याचं ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यासाठीच मालवीय यांचं ट्विट ‘फेक न्यूज’ म्हणून प्लॅग झालंय. यामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे (BJP IT cell head Amit Malviya terms farmer protest as propaganda Twitter marks it as manipulated media).
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीमवर मोठ्या प्रमाणात खोटी माहिती पसरवून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर ट्विटर इंडियाने भारतात खोटी किंवा फसवी, दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांच्या ट्विटला फ्लॅग करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार खोटी माहिती पसरवणाऱ्या ट्विटच्या खाली ट्विटर वापरकर्त्यांना सावधानीचा इशारा देत ही माहिती विश्वासार्ह नसल्याचं आणि दिशाभूल करणारी असल्याचं सांगितलं जातं. यानुसार थेट भाजप आयटी सेलच्या प्रमुखांविरोधातच कारवाई झाल्याने सोशल मीडियावर अमित मालवीय यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तसेच राजकीय हेतूने शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप होत आहे.
Rahul Gandhi must be the most discredited opposition leader India has seen in a long long time. https://t.co/9wQeNE5xAP pic.twitter.com/b4HjXTHPSx
— Amit Malviya (@amitmalviya) November 28, 2020
अमित मालवीय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं एक ट्विट शेअर करत त्यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते, “राहुल गांधी भारतातील आतापर्यंतचे सर्वात जास्त चुकीची माहिती पसरवणारे नेते आहेत.” मालवीय यांनी आपल्या व्हिडीओत दावा केला होता की शेतकऱ्यांना मारणं तर दूर पोलिसांच्या काठीचाही स्पर्श झालेला नाही.
फॅक्ट चेकिंग न्यूज वेबसाईट अल्ट न्यूजने भाजप आयटी सेलच्या दाव्याचा पर्दाफाश करत संबंधित शेतकऱ्याचा दुसरा व्हिडीओ समोर आणला आहे. त्यात पोलीस रांगेत उभे राहून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करताना दिसत आहे. त्यातील काही काठ्या शेतकऱ्यांना लागतात तर काही नाही. पण अमित मालवीय यांनी शेतकऱ्याला काठी न लागलेला निवडक व्हिडीओ घेत शेतकऱ्यांना मारहाण झालीच नसल्याचाच अजब दावा केला.
▶️ Thousands of Indian farmers clashed with police, Friday, as the farmers continued to march towards New Delhi in protest of new farming laws.
? Indian Farmers Clash with Police as They Protest New Lawshttps://t.co/I5Tx0hA4kP pic.twitter.com/NdRKWn0dXe
— The Voice of America (@VOANews) November 27, 2020
विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी 28 नोव्हेंबरला केलेल्या ट्विटमध्ये मारहाणीचा दावा केलाच नव्हता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदी सरकार देशातील जवान आणि शेतकरी यांना एकमेकांविरोधात उभं करत असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, “खूप दुखद फोटो आहे. आपली घोषणा ‘जय जवान, जय किसान’ची होती. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराने जवानांना शेतकऱ्यांविरोधात उभं केलं आहे. हे फार धोकादायक आहे.’
राहुल गांधी यांचं हेच ट्विट रिट्विट करत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘Propaganda vs Reality’ नावाचा एक व्हिडीयो शेअर केला. यात त्यांनी राहुल गांधी यांनी ट्विट केलेला फोटो ‘प्रोपोगंडा’ असल्याचा दावा केला. तसेच दुसरीकडे एका व्हिडीओचा शेतकऱ्याला काठी न लागल्याचा निवडक भाग त्यावर रिअॅलिटी म्हटलं आहे. या व्हिडीओतून मालवीय यांनी पोलिसांनी वयोवृद्ध शेतकऱ्याला स्पर्शही केला नसल्याचा दावा केला.
अमित मालवीय यांचा हा दावा खोटा सिद्ध झाला आहे. मालवीय यांनी दिल्लीच्या सिंधु बॉर्डरवर सुरु शेतकरी आंदोलनाच्या व्हिडीओचा एक निवडक भाग घेतला होता. त्यांच्या व्हिडीओत देखील हा व्हिडीओ अर्धवट असल्याचं स्पष्टपणे दिसतं. लाठीचार्ज होताना दाखवलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचं नाव सुखदेव सिंह असं आहे. सुखदेव सिंह आत्ताही हरियाणा-दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. त्यांनी स्वतः आपल्यावर लाठीचार्ज झाल्याचं आणि पाठीला जखमा झाल्याचं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
BREAKING | शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत? राजू शेट्टी कडाडले
BJP IT cell head Amit Malviya terms farmer protest as propaganda Twitter marks it as manipulated media