सचिन तेंडुलकरवरुन बिहारचं राजकारण तापलं, शिवानंद तिवारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटिंच्या ट्वीटला जोरदार उत्तर दिलं होतं. त्यावरुन आरजेडीचे नेते शिवानंद तिवारी सचिन तेंडुलकरवर तुटून पडले आहेत.

सचिन तेंडुलकरवरुन बिहारचं राजकारण तापलं, शिवानंद तिवारी यांचं वादग्रस्त वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 9:19 PM

नवी दिल्ली : बिहारमध्ये सध्या भारतरत्न सचिन तेंडुलकरवरुन जोरदार राजकारण तापलं आहे. राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडीचे नेते शिवानंद तिवारी यांनी सचिन तेंडुलकरबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिहारचं राजकारण तसं पाहायला गेलं तर नितीश कुमार, तेजस्वी यादव, चिराग पासवान, विकासाचा मुद्दा, गुन्हेगारीपुरतंच सिमित राहिलं आहे. पण आता शिवानंद तिवारी यांनी सचिन तेंडुलकरवरच टीकास्त्र सोडलंय.(BJP-JDU answers to Shivanand Tiwari for criticizing Sachin Tendulkar)

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटिंच्या ट्वीटला जोरदार उत्तर दिलं होतं. त्यावरुन आरजेडीचे नेते शिवानंद तिवारी सचिन तेंडुलकरवर तुटून पडले आहेत. शेतकऱ्यांना ट्वीटचं राजकारण येत नाही. त्यांना ग्रेटा थनबर्ग किंवा पॉपस्टार रिहानाबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या ट्वीटला उत्तर देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांने मैदानात उतरावं हा देशाचा अपमान आहे. शिवानंद तिवारी इथेच थांबले नाही. सचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न देण्यात आला होता, तेव्हाही आपण विरोध केला होता. पुन्हा एकदा सांगतो की, सचिनसारख्या व्यक्तीला भारतरत्न देणं चुकीचं होतं. भारतरत्नने सन्मानित व्यक्त विविध वस्तूंच्या जाहिराती करत नाही. हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान आहे, असंही तिवारी म्हणाले.

सचिन तेंडुलकरचं ट्वीट काय?

सचिन तेंडुलकरने आपल्या ट्वीटमध्ये असं काय लिहिलं होतं की जे शिवानंद तिवारी यांना पसंत पडलं नाही, हे जाणून घेणं गरजेचं. सचिन तेंडुलकरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, ठभारताच्या सार्वभौमत्वाबद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरच्या शक्ती पाहू शकतात पण यात सहभागी होऊ शकत नाही. भारतीय नागरिक भारताला ओळखतात आणि भारताबाबत निर्णय घेऊ शकतात. या देशात आम्ही एकत्र राहतो”.

शिवानंद तिवारी भाजप-जेडीयूच्या निशाण्यावर

शिवानंद तिवारी यांनी सचिन तेंडुलकरवर टीका केल्यानंतर भाजप आणि जेडीयू नेते तिवारी यांच्यावर तुटून पडले आहेत. जेडीयू प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी तिवारी यांच्यावर टीका करताना म्हटलं की, विदेशी सेलिब्रिटींचा सन्मान आणि कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा अपमान, हे काम आरजेडी नेतेच करु शकतात. शिवानंद तिवारी यांनी भारतातील कोट्यवधी लोकांना ठेच पोहोचवली आहे, अशी टीका जेडीयूने केलीय.

संबंधित बातम्या :

Farmer Protest : ‘जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार’, राकेश टिकैत यांची घोषणा, 2 ट्रक मातीही मागवली!

‘श्रीमंताच्या घरातील कावळाही मोर वाटतो’, नवज्योत सिद्धूंच्या ‘बॅटिंग’ने मोदी सरकारची कोंडी, ट्विटरवर घमासान

BJP-JDU answers to Shivanand Tiwari for criticizing Sachin Tendulkar

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.