VIDEO:मुसलमान असण्याच्या संशयावरुन मानसिक रुग्णाला मारहाण, वयस्कर व्यक्तीची हत्या, व्हिडीओही केला शूट, भाजपा नेता अटकेत
१६ मे रोजी पूजा झाल्यानंतर भंवरलाल बेपत्ता झाले. आता गुरुवारी त्यांचा मृतदेह रामपुरा रस्त्यावर सापडला. त्यानंतर भंवरलाल यांना मारहाणीचा व्हिडीओही समोर आला आहे. या प्रकरणात भाजपा नेता दिनेश कुशवाह याला पोलिसांनी अटक केली आहे.
रतलाम – मानसिक विकलांग असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीला मुसलमान (Muslim) असल्याच्या संशयावरुन केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. एका भाजपा नेत्याने (BJP leader)ही मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओही(video) तयार केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. भंवरलाल असे या मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांची आई ८५ वर्षांची महिला सरपंच आहे. तर भवरलाल यांचा भाऊ भाजपाचा कार्यकर्ता आहे. मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भवरलाल यांचे कुटुंब, महिला सरपंचासह चित्तोडगड येथे १५ मे रोजी पूजेसाठी गेले होते. १६ मे रोजी पूजा झाल्यानंतर भंवरलाल बेपत्ता झाले. आता गुरुवारी त्यांचा मृतदेह रामपुरा रस्त्यावर सापडला. त्यानंतर भंवरलाल यांना मारहाणीचा व्हिडीओही समोर आला आहे. या प्रकरणात भाजपा नेता दिनेश कुशवाह याला पोलिसांनी अटक केली आहे.
VIDEO : मध्य प्रदेशात मुस्लीम असल्याच्या संशयावरुन केलेल्या मारहाणीत भवरलाल यांचा मृत्यू, भाजपा नेत्याने केली मारहाण, व्हिडीओही केला शूट, भाजपा नेत्याला अटक#BJP @BJP4India
हे सुद्धा वाचाअधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/NQT5xIr3cR
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 21, 2022
काय आहे व्हिडीओत
भाजपाचा नेता दिनेश कुशवाहा या व्हिडीओत मानसिक रुग्ण असलेल्या भंवरलाल यांना आधारकार्ड दाखवण्यास सांगतो आणि वारंवार मारताना दिसतो आहे. मानसिक विकलांग असलेल्या भंवरलाल यांना आरोपी भाजपा नेता नाव विचारतो, तेव्हा भवरलाल चुकून त्यांचे नाव मोहम्मद असे सांगतात. त्यानंतर दिनेश त्यांच्यावर तुटून पडताना व्हिडीओत दिसतो आहे.
कोण आहे दिनेश कुशवाहा
या प्रकरणात दिनेश कुशवाहा याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दिनेश कुशवाह हा भाजपा युवा मोर्चाचा नगराचा पदाधिकारी राहिलेला आहे. त्याची पत्नी मानसी ही नगरपरिषदेच्या वॉर्डमधून निवडून आली होती.
मानसिक रुग्ण होते भवरलाल
रतलामच्या सिरसा गावच्या सरपंच पिस्ताबाई चत्तर यांना तीन मुलं होती. त्यात भवरलाल हे मोठे होते. अशोक आणि राजेश ही त्यांनी दोन्ही मुलेही समाजसेवेत आहेत. मोठा मुलगा भवरलाल हा मानसिक रुग्ण असल्याने त्याचे लग्नही करण्यात आलेले नव्हते.
चित्तोडगड किल्ल्यातून भवरलाल झाले बेपत्ता
चितोडगड येथून १६ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास भवरलाल कुणालाही न सांगता तिथून बसमधून निघून आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेहच मिळाला.
मारहाण केल्याचा व्हिडीओ आरोपीनेच केला व्हायरल
हा मारहाणीचा व्हिडीओ आरोपी दिनेशनेच एका व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केला. तिथून तो भवरलाल यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचला. पोलिसांनी याच व्हिडीओच्या आधारावर भाजपा नगरसेवकाच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केला. सुरुवातीला पोलीस या प्रकरणात कारवाीस टाळाटाळ करत होते. मात्र नंतर ३०२ आणि ३०४ कलमखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीतच भवरलाल यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मारहाण करणाऱ्यांनी त्यांच्या खिशातले २०० रुपयेही चोरले.
ये मध्यप्रदेश में आख़िर हो क्या रहा है…? सिवनी में आदिवासियों की पीट-पीटकर हत्या , गुना , महू , मंडला की घटनाएँ और अब प्रदेश के नीमच ज़िले के मनासा में एक बुजुर्ग व्यक्ति जिनका नाम भँवरलाल जैन बताया जा रहा है की पीट-पीटकर हत्या…
— Kamal Nath (@OfficeOfKNath) May 21, 2022
मुझे जानकारी मिली है कि भाजपा के दिनेश कुशवाह के विरुध्द धारा ३०२ के अंतर्गत जुर्म क़ायम किया गया है। देखते हैं गिरफ़्तारी होती है या नहीं। https://t.co/JoJvI0AbyH
— digvijaya singh (@digvijaya_28) May 21, 2022
या हत्येनंतर राजकारण
यानंतर राज्याच गृहमंत्री निरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की पीडित कुटुंबीयांशी त्यांचे बोलणे झाले आहे, मात्र कुटुंबीयांनी बोलणे झाले नसल्याचे सांगितले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणात मध्यप्रदेशात काय सुरु आहे, असा सवाल करत शिवराजसिंह चौहान यांना प्रश्न विचारला आहे. काँग्रेस नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी याबाबत सरकारला घेरले आहे. तर निरोत्तम मिश्रा यांनीही दिग्विजय सिंह हे इतर धर्मांबाबत का बोलत नाहीत, असा आश्चर्यकारक प्रश्न विचारला आहे.