Ram Temple | राम मंदिराच्या उद्घाटनाला येऊ नका अशी लालकृष्ण आडवाणींना विनंती का केली? काय कारण?
Ram Temple | राम मंदिर आंदोलनात सुरुवातीपासून सक्रीय राहिलेल्या BJP च्या दोन मोठ्या नेत्यांना प्रतिष्ठापनेला तुम्ही येऊ नका, अशी राम मंदिर ट्रस्टनेच विनंती का केली? त्यामागे काय कारण आहे? राम मंदिरात प्रतिष्ठापना विधी किती तारखेला सुरु होणार? किती तारखेपर्यंत हे विधी चालणार?
नवी दिल्ली : पुढच्या महिन्यात अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. 90 च्या दशकात देशात राम मंदिर आंदोलनाची सुरुवात झाली. देशभरातून वेगवेगळ्या रथयात्रा निघाल्या. याच राम मंदिर आंदोलनामुळे भाजपाची जनतेतील पाळमुळ भक्कम झाली. पुढच्या महिन्यात भव्य राम मंदिर भक्तांसाठी खुल होईल. या राम जन्मभूमी आंदोलनात सुरुवातीपासून भाजपाचे दोन मोठे नेते सक्रीय होते. ते म्हणजे लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी. भाजपाचे हे दोन्ही नेते राम मंदिर आंदोलनाचा चेहरा होते. आडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यावेळी देशभरात वेगवेगळ्या रथयात्रा निघाल्या. आता पुढच्या महिन्यात राम मंदिराच उद्घाटन होईल, त्यावेळी हे दोन्ही मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. याच कारण आहे लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचं वाढत वय आणि प्रकृती.
“आडवाणी आणि जोशी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या वयाचा विचार करुन, त्यांना येऊ नको अशी विनंती केलीय. ती दोघांनी मान्य केलीय” असं राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चम्पत राय यांनी पत्रकारांना सांगितलं. “22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल. त्याची जोरात तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील” असं राय यांनी सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
प्राण प्रतिष्ठा विधी किती तारखेला सुरु होणार?
“सर्व तयारी 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. प्राण प्रतिष्ठा 16 जानेवारीला सुरु होईल. 22 जानेवारीपर्यंत हे विधी सुरु राहतील” असं राय यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी कोणा-कोणाला निमंत्रित केलय, त्याची माहिती राय यांनी दिली. प्रकृती आणि वय या कारणांमुळे आडवाणी आणि जोशी कदाचित प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार नाहीत, असं ते म्हणाले. लालकृष्ण आडवाणींच वय आता 96 आणि मुरली मनोहर जोशी 90 वर्षांचे आहेत.
कुठल्या मंदिराच्या प्रमुखांना निमंत्रण?
“तीन सदस्यांची टीम बनवण्यात आली आहे. त्यांनी माजी पंतप्रधान देवेगौडा यांना कार्यक्रमाच निमंत्रण दिलं. शंकराचार्य आणि जवळपास 150 संत कार्यक्रमात सहभागी होतील” अशी माहिती राय यांनी दिली. देशातील महत्त्वाची मंदिर जसं की, काशी विश्वनाथ, वैष्णव देवी आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
बॉलिवूड आणि उद्योग जगतातून कोणाला निमंत्रण?
दलाई लामा, योग गुरु बाबा रामदेव, सिने अभिनेता रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, मधुर भांडारकर, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, इस्रोचे संचालक निलेश देसाई आणि अन्य मान्यवरांना उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.