पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला, चर्चांना उधाण
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. (pankaja munde)
नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात आहे. (Bjp leader pankaja munde reached at delhi to meet pm narendra modi)
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. मात्र, पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. दिल्लीत नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत. त्यांच्ंयासोबत जेपी नड्डा. विनोद तावडे आणि पक्षाचे इतर राष्ट्रीय सचिवही उपस्थित आहेत.
मोदी संवाद साधणार
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांशी चर्चा करणार आहेत. आगामी उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी या सचिवांशी संवाद साधणार आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, सरकार म्हणून केलेली कामे याबाबत या सचिवांशी मोदी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येतं.
पंकजा नाराजी व्यक्त करणार
दरम्यान, या दिल्ली भेटीत पंकजा मुंडे या पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्याकडे मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मोदी यांच्याकडून पंकजा यांना वेळ मिळण्याची शक्यताही कमी असल्याचं बोललं जात आहे.
समर्थकांचे राजीनामे, बैठक
पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचं भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
बीडमध्ये सर्वच 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा
दरम्यान, मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर ही संख्या आता 25 वर पोहोचली आहे. (Bjp leader pankaja munde reached at delhi to meet pm narendra modi)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 July 2021 https://t.co/3tPv9V02EI #News #Bulletin #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 11, 2021
संबंधित बातम्या:
पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, जेपी नड्डांशी चर्चा करणार; तर्कवितर्कांना उधाण
एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी; पंकजा मुंडे म्हणाल्या…
(Bjp leader pankaja munde reached at delhi to meet pm narendra modi)