पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते राकेश पंडिता यांचा मृत्यू
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजप नेते राकेश पंडित यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. BJP leader Rakesh Pandit
जम्मू काश्मीरः पुलवाम्यात भाजप नेत्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानं एकच खळबळ उडालीय. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजप नेते राकेश पंडिता यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भाजप नेते राकेश पंडिता यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत त्यांना ठार केले. राकेश पंडिता यांच्यावर त्याच्या घराजवळ गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात राकेश पंडिता गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. (BJP leader Rakesh Pandita shot dead in Pulwama)
Three unidentified terrorists shot dead Municipal Councillor of Tral Rakesh Pandita Somnath this evening. He was rushed to hospital where he succumbed to injuries: Kashmir IG Vijay Kumar pic.twitter.com/CmElXVYeCv
— ANI (@ANI) June 2, 2021
राकेश पंडिता हे पुलवामा जिल्ह्यातील त्राल शहराचे नगराध्यक्ष
राकेश पंडिता हे पुलवामा जिल्ह्यातील त्राल शहराचे नगराध्यक्ष होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटद्वारे घटनेची माहिती दिलीय. पोलिसांनी ट्विट केले की, “दहशतवाद्यांनी त्रालमध्ये नगरसेवक राकेश पंडिता यांना गोळ्या घालून ठार केले. श्रीनगरमध्ये 2 पीएसओ आणि सुरक्षित हॉटेल सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही राकेश पंडिता पीएसओविना त्रालला गेले होते. त्या परिसराला आता घेराव घातला गेला असून, पोलिसांनी सर्च मोहीम सुरू केलीय. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, आज संध्याकाळी त्राल नगरपालिकेचे नगरसेवक राकेश पंडिता सोमनाथ यांना तीन अज्ञात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांचा मृत्यू झाला.
गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले
ही भयानक घटना घडवून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या राकेश पंडिताला उचलून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संबंधित बातम्या
लसींच्या खरेदीचा लेखाजोखा दोन आठवड्यात सादर करा; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश
राहुल गांधींचा ट्विटर धमाका, एका दिवसात अनेक नेते, पत्रकारांना केलं अनफॉलो
BJP leader Rakesh Pandita shot dead in Pulwama