राम माधव यांचा पोर्टफोलियो बदलला; भाजपमधून संघात वापसी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेंगळुरू येथे पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (BJP Leader Ram Madhav Called Back to RSS, Will Work in All India Executive Wing)

राम माधव यांचा पोर्टफोलियो बदलला; भाजपमधून संघात वापसी
Ram Madhav
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 7:25 AM

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेंगळुरू येथे पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत भैय्या जोशी यांच्या जागी दत्तात्रय होसबोळे यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच भाजपचे माजी राष्ट्रीय महासचिव राम माधव यांना पुन्हा एकदा संघात बोलावण्यात आलं आहे. तर भाजपमध्ये संघटन महामंत्री राहिलेल्या रामलाल यांना संघात अखिल भारतीय संपर्क प्रमुख बनवण्यात आलं आहे. (BJP Leader Ram Madhav Called Back to RSS, Will Work in All India Executive Wing)

शनिवारी संघाच्या प्रतिनिधी सभेत राम माधव यांना संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राम माधव यांना यापूर्वी संघातूनच भाजपमध्ये पाठवण्यात आलं होतं. भाजपमध्ये आल्यानंतर माधव यांच्याकडे महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची संघात पुन्हा वापसी झाली आहे. भाजपचे महासचिव म्हणून काम करत असताना माधव हे जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांचे प्रभारी होते. आता ते संघाच्या कार्याशी जोडले जाणार आहेत.

होसबळे यांची निवड

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांचे निवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेत होसबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. होसबळे यांचा सरकार्यवाहपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. यापूर्वी ते संघात सह सरकार्यवाह म्हणून कार्यरत होते.

कोण आहेत होसबळे

दत्तात्रय होसबळे यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेद्वारे त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. ते एबीव्हीपीमध्ये अॅक्टिव्ह होते. ते एबीव्हीपीचे दोन दशक संघटन महामंत्री होते. आता ते संघ सरकार्यवाह म्हणून संघात कार्यरत होते. होसबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना पटण्याहून लखनऊला बोलावण्यात आले होते. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2015मध्येच होसबळे यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो अयशस्वी झाला. संघातील एका गटाने त्यांच्या नावाला विरोध केला होता. (BJP Leader Ram Madhav Called Back to RSS, Will Work in All India Executive Wing)

संबंधित बातम्या:

दत्तात्रय होसबळे संघाचे नवे सरकार्यवाह; वाचा, कोण आहेत होसबळे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाहची निवड कशी होते?; वाचा सविस्तर

सर्वसामान्यांची बत्ती गुल, ऊर्जामंत्र्यांची पॉवर फुल, नितीन राऊतांच्या घरातील झगमगटावर भाजप आक्रमक

(BJP Leader Ram Madhav Called Back to RSS, Will Work in All India Executive Wing)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.