Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं तुमच्याच सरकारने कोर्टाला सांगितलं; संबित पात्रांचा राऊतांवर पलटवार

संजय राऊत यांना कदाचित सत्य माहीत नसावे. ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं त्यांच्याच सरकारने कोर्टात सांगितलं. (Sambit Patra)

ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं तुमच्याच सरकारने कोर्टाला सांगितलं; संबित पात्रांचा राऊतांवर पलटवार
sambit patra
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 4:19 PM

नवी दिल्ली: ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं महाराष्ट्र सरकारनेच कोर्टाला सांगितलं आहे. त्यामुळे संजय राऊतांना कदाचित सत्य माहीत नसावं, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. राऊतांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हा पलटवार केला. (BJP leader Sambit Patra attacks sanjay raut over death of oxygen shortage)

संजय राऊत यांना कदाचित सत्य माहीत नसावे. ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं त्यांच्याच सरकारने कोर्टात सांगितलं. या प्रकरणी काही लोक कोर्टात गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने कोर्टाला ही माहिती दिली होती. ऑक्जिनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा केंद्र सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा केल्याचं खुद्द मुंबई महापालिकाचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सुद्धा एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे, असं पात्रा म्हणाले.

आपनेही कोर्टात ‘ते’ कारण दिलं नाही

ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष अजून राजकारणच करत आहे. काल केंद्र सरकारने कोरोनाबाबतचं सादरीकरण केलं. त्या बैठकीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते उपस्थित नव्हते. बैठकीला यायचं नाही आणि टीका करायचं हे योग्य नाही, असं ते म्हणाले. कोणत्याही राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झालेले नाहीत. 27 एप्रिल रोजी कोर्टात एक प्रकरण होतं. त्यावेळी आम आदमी पार्टीने कोर्टात राज्यात 21 मृत्यू झाल्याचं सांगितलं. पण हे मृत्यू कोमोरबिडिटीमुळे झाल्याचं आपने कोर्टात म्हटलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

संभ्रम निर्माण करण्याचं काम

एकाही राज्याने ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचे आकडे केंद्राल दिलेले नाहीत. राज्यात ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचंही कोणत्याही राज्याने म्हटलेलं नाही. महामारी असो, व्हॅक्सिनचा विषय असो प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा एवढंच काम राहुल गांधी करत आहेत. एक ट्विटर ट्रोल म्हणून राहुल गांधी हे काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (BJP leader Sambit Patra attacks sanjay raut over death of oxygen shortage)

संबंधित बातम्या:

ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही, सरकारच्या उत्तराने विरोधक भडकले; विषेशाधिकार भंगाचा प्रस्ताव आणणार

ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करावा; संजय राऊत संतापले

राज्यांना केवळ आरक्षणाचा अधिकार देऊन फायदा नाही, 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करा; अशोक चव्हाणांची मागणी

(BJP leader Sambit Patra attacks sanjay raut over death of oxygen shortage)

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....