Ram Mandir Pran Pratishtha | क्षणच इतका भावनिक होता की…राम मंदिर परिसरात येताच दोघी मिठी मारुन रडल्या
Ram Mandir Pran Pratishtha | राम जन्मभूमी आंदोलनालाशी अनेक लोक निगडीत आहेत. आज भव्यदिव्य मंदिर डोळ्यासमोर दिसतय. पण त्यामागे बऱ्याच लोकांच योगदान आहेत. यामध्ये कारसेवकांना विसरुन चालणार नाही. कारण त्यांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या होत्या.
Ram Mandir Pran Pratishtha | अखेर 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत. अयोध्येच्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. सगळ्या देशासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. जगभरातील रामभक्त ही पवित्र घटिका जवळ येण्याची वाट पाहत होते. आजपासून अयोध्येतील भव्य राम मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुल झालं आहे. अयोध्येत हे राम मंदिर सहज उभ राहिलेलं नाहीय. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. प्रचंड मोठ जनआंदोलन उभ राहिलं. राम जन्मभूमी आंदोलनालाशी अनेक लोक निगडीत आहेत. आज भव्यदिव्य मंदिर डोळ्यासमोर दिसतय. पण त्यामागे बऱ्याच लोकांच योगदान आहेत. यामध्ये कारसेवकांना विसरुन चालणार नाही. कारण त्यांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. राम मंदिर आंदोलनातील अनेक नेते आज राजकारणात मोठ्या स्थानावर आहेत तर काही प्रवाहाबाहेर गेले आहेत.
आज अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने हे विखुरलेले नेते एकत्र आले. त्यावेळी वातावरण भावनिक होण स्वाभाविक आहे. 90 च्या दशकात राम मंदिर आंदोलनाने संपूर्ण देशात जोर पकडला होता. त्यावेळी दोन महिला नेत्यांची खूप खूप चर्चा होती. लालकृष्ण आडवाणींसोबत त्या सुद्धा आघाडीवर राहून राम मंदिर आंदोलनाच नेतृत्व करत होत्या. त्यांच्या शब्दांनी हजारो, लाखो रामभक्तांमध्ये चेतना निर्माण केली. त्यांच्या भाषणांनी कारसेवकांमध्ये जोश संचारायच. याच दोन महिला नेत्या आज राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्या. त्यावेळी त्या खूप भावनिक झाल्या होत्या.
आंदोलनातील ते सगळे क्षण त्यांच्या डोळ्यासमोरुन तरळून गेले
प्राणप्रतिष्ठेच्या काहीवेळ आधी मंदिर परिसरात माजी मुख्यमंत्री, भाजपा नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा आमने-सामने आल्या. त्यावेळी दोघी खूप भावूक झाल्या होत्या. दोघींनी परस्परांना मिठी मारली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण राम जन्मभूमी आंदोलनातील ते सगळे क्षण त्यांच्या डोळ्यासमोरुन तरळून गेले असतील. इतक्या मोठ्या संघर्षानंतर आज हे भव्य मंदिर उभ राहिलय. त्यामुळे दोघी भावनिक होण स्वाभाविक आहे.