काश्मीरमधील बिहारी मजुरांच्या सुरक्षेसाठी त्यांना AK-47 द्या, भाजप आमदाराची मागणी

जम्मू -काश्मीरमध्ये बिहारी नागरिकांवर होणारे हल्ले आणि हत्यांच्या घटनांमुळे बिहारच्या लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. बिहारची सामान्य जनता तसेच राज्यातील नेते खूप नाराज आहेत.

काश्मीरमधील बिहारी मजुरांच्या सुरक्षेसाठी त्यांना AK-47 द्या, भाजप आमदाराची मागणी
ज्ञानेंद्र ज्ञानू
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 5:15 PM

पाटणा: जम्मू -काश्मीरमध्ये बिहारी नागरिकांवर होणारे हल्ले आणि हत्यांच्या घटनांमुळे बिहारच्या लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. बिहारची सामान्य जनता तसेच राज्यातील नेते खूप नाराज आहेत. सरकार आणि विरोधी पक्षाचे नेते सतत या प्रकरणी केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी करत आहेत. आता बिहारमधील भाजपचे आमदार ज्ञानेंद्र ज्ञानू यांनीही या प्रकरणी सरकारसमोर वेगळी मागणी ठेवली आहे. जम्मू-काश्मीरमधील बाहेरील लोकांच्या सुरक्षेसाठी सरकारने त्यांना एके -47 मोफत द्यावी, जेणेकरून तो स्वतःचे रक्षण करू शकतील, असं ज्ञानेंद्र ज्ञानू यांनी म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरच्या बाहेरच्या लोकांना शस्त्र परवाना द्या

जम्मू -काश्मीरमध्ये राहणाऱ्या बाहेरील लोकांना शस्त्र परवाना देण्यात यावा, अशी मागणी भाजप आमदाराने सरकारकडे केली आहे. ते म्हणाले की जम्मू-काश्मीर सरकारने बाहेरच्या लोकांना एके -47 पुरवावे, तरच परिस्थिती सुधारली जाईल. काश्मीरमध्ये बिहारींवर होणारे हल्ले आणि हत्यांचा भाजप आमदार ज्ञानू यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी या घटनेला भ्याडपणा म्हटले आहे.

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर बिहारी

भाजपचे आमदार ज्ञानेंद्र ज्ञानू म्हणाले की, दहशतवादी गरिब लोकांची हत्या करत आहेत. दररोज काम करुन पैसे कमावणाऱ्या लोकांची हत्या केली जात आहे. दहशतवादी पाकिस्तानच्या संगनमताने बिहारच्या जनतेला लक्ष्य करत आहेत, असं ते म्हणत आहेत. जम्मू -काश्मीरमधील घटनेवर केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी भाजप आमदाराने केली आहे. जम्मू काश्मीरच्या बाहेरच्या लोकांना सुरक्षा दिली पाहिजे. जेणेकरून तेथे स्थलांतर थांबवता येईल, असंही भाजप आमदार म्हणाले. यापूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याची मागणी केली होती.

मजुरांना मारणारा आतंकवादी ठार

ज्ञानेंद्र ज्ञानू यांनी नरेंद्र मोदींना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने देखील थांबले पाहिजेत, अशी मागणी केली आहे. जम्मू -काश्मीरमधील घटनेवर पाटण्यात अनेक पक्ष रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. मात्र, बिहारमधील अररियाच्या दोन्ही मजुरांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला पोलिसांनी कुलगाममध्ये ठार केले आहे. ठार झालेला दहशतवादी गुलजार अहमद रेशी हा लष्कर-ए-तय्यबाचा जिल्हा कमांडर होता. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी लष्करचे जिल्हा कमांडर गुलजार अहमद रेशी यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.

इतर बातम्या:

‘मंत्रालय बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी लुटत होते’, सोमय्यांचा पुन्हा मुश्रीफांवर घणाघात; राजीनाम्याचीही मागणी

विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा

मेळावे आणि चित्रा वाघांना प्रत्युत्तर यापलीकडे चाकणकरांनी महिलांसाठी काय केलं? शालिनी ठाकरेंचा सवाल

bjp mla gynendra gyanu demand to government provide ak 47 to people for security

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.