याद राखा, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला यायचंच आहे; भाजपच्या खासदाराची धमकी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका संपताच हिंसा भडकली आहे. (BJP MP Pravesh Singh Verma warns TMC on Bengal violence)

याद राखा, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला यायचंच आहे; भाजपच्या खासदाराची धमकी
Pravesh Singh Verma
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 12:08 PM

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये निवडणुका संपताच हिंसा भडकली आहे. तृणमूल काँग्रेसकडून कार्यकर्त्यांची हत्या केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हिंसाचारावरून भाजपचे खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केला आहे. (BJP MP Pravesh Singh Verma warns TMC on Bengal violence)

बंगालमधील हिंसेवरून भाजपचे खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी थेट टीएमसीलाच धमकावले आहे. याद राखा, बंगालच्या मुख्यमंत्री, टीएमसीचे खासदार आणि आमदारांना दिल्लीत यायचं आहे, हा इशाराच समजा, अशी उघड धमकीच वर्मा यांनी दिली आहे. थेट खासदारानेच मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या खासदारांना धमकावल्याने खळबळ उडाली आहे. प्रवेश सिंह वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे चिरंजीव आहेत.

टीएमसी प्रायोजित हल्ले

निवडणुकीत जयपराजय होतच असतो. पण हत्या होत नाही. टीएमसीचे गुंड बंगालच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत, असं वर्मा यांनी म्हटलं आहे. टीएमसीचे गुंडं आमच्या कार्यकर्त्यांची हत्या करत आहेत. त्यांना मारहाण केली आहे. त्यांची वाहने तोडत आहेत. घरांना आग लावत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर बंगालचे भाजप प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनीही या हिंसेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली होती. मतमोजणीनंतर भाजप कार्यकर्त्यांवर टीएमसी प्रायोजित हल्ले होत आहे, असा आरोप विजयवर्गीय यांनी केला होता.

नड्डा आज बंगालमध्ये

कैलाश विजयवर्गीय सध्या बंगालमध्ये आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज 4 मे रोजी बंगालमध्ये येत आहेत. निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपच्या चार कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. तसेच चार हजारपेक्षा अधिक घरांवर हल्ले करण्यात आले आहेत, असं विजयवर्गीय म्हणाले. (BJP MP Pravesh Singh Verma warns TMC on Bengal violence)

संबंधित बातम्या:

बंगालनंतर भाजपला उत्तर प्रदेशातही झटका; पंचायत निवडणुकीत अखिलेशच्या सपाचा बोलबाला

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकच उपाय, देशव्यापी लॉकडाऊन करा; राहुल गांधी यांची मागणी

टाळी एका हाताने वाजत नाही; बंगालमधील हिंसेवरून राऊतांनी भाजपला फटकारले

(BJP MP Pravesh Singh Verma warns TMC on Bengal violence)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.