कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन 5B, काय आहे रणनीती

| Updated on: Feb 18, 2023 | 12:32 PM

2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यांमध्ये भाजपला केवळ 30 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने 37 जागा जिंकल्या होत्या, तर जेडीएसला 5 जागा मिळाल्या होत्या.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन 5B, काय आहे रणनीती
भाजप कर्नाटक
Follow us on

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (karnataka assembly election) घोषणा अजून झालेली नाही. परंतु भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांपासून पक्षाचे अनेक प्रमुख नेते व केंद्रीय मंत्री कर्नाटकात येणार आहे. १ मार्चपासून भाजपकडून चार विजय संकल्प रथयात्रा काढण्यात (Karnataka Polls 2023) येणार आहे. राज्याच्या चारही दिशांमधून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून या रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवतील. या निवडणुकीसाठी भाजपने प्लॅन 5B तयार केला आहे.

काय आहे प्लॅन 5B


भाजपच्या प्लॅन 5B मध्ये पाच जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या 72 जागा आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये बेंगळुरू, बेळगाव, बागलकोट, बिदर आणि बेल्लारी यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांची नावे B ने सुरु होत असल्याने भाजपने त्याला 5B असे नाव दिले आहे. 2018 मध्ये या जिल्ह्यांमध्ये भाजपला केवळ 30 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने 37 जागा जिंकल्या होत्या, तर जेडीएसला 5 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपला येथे कोणतीही चूक करायची नाही आणि त्यासाठी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

बंगळुरूमध्ये धक्काबुक्की झाली


2018 च्या निवडणुकीत शहरी भागात पाय रोवणाऱ्या भाजपला राजधानी बंगळुरूमध्येच मोठा धक्का बसला. बेंगळुरू जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण अशा एकूण 32 जागा आहेत, परंतु 2018 मध्ये भाजपला केवळ 11 जागा मिळाल्या. या सर्व जागा बंगळुरू शहर परिसरात आढळून आल्या. शहरी भागात विधानसभेच्या 28 जागा आहेत.

बेळगाव जिल्ह्यात 18 जागा


बेळगाव जिल्ह्यात 18 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला येथे 10 जागा मिळाल्या होत्या. बागलकोटमध्ये पक्षाने 7 पैकी 5 जागा जिंकल्या. बिदर आणि बेल्लारीमध्येही पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. बिदरमधील 6 जागांपैकी केवळ 1 जागा जिंकली, तर बेल्लारीत 9 पैकी केवळ 3 जागा आल्या. त्यामुळेच यावेळी भाजपला या भागांमध्ये कोणतीही कमकुवतपणा ठेवायची नसून या भागासाठी खास रणनीती तयार करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

मोदींच्या पाच सभा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात चार ते पाच सभा होऊ शकतात. 27 फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त शिमोगा येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मोदी उपस्थित राहणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान म्हैसूर-बेंगळुरू एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करणार आहे. १ मार्चपासून भाजप कर्नाटकात चार विजय संकल्प रथयात्रा काढणार आहे. त्यांच्या समारोपाच्या दिवशी मोदी मध्य कर्नाटकातील दावणगेरे येथे जाहीर सभेलाही संबोधित करतील.