BJP News | ‘या’ तारखेपासून सुरु होणार भाजपाचा सुशासन महोत्सव, कोण करणार उद्घाटन?

BJP News | रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ट्रस्टकडून आयोजित 'सुशासन महोत्सव'. या दरम्यान भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा एका पुस्तकाच प्रकाशन करतील. विनय सहस्रबुद्धे आणि मुकुल प्रियदर्शी यांनी संपादन केलेल्या लेखांच यामध्ये संकलन आहे.

BJP News | 'या' तारखेपासून सुरु होणार भाजपाचा सुशासन महोत्सव, कोण करणार उद्घाटन?
J.P.Nadda
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 10:21 AM

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने सुशासन महोत्सव आयोजित केला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे वाइस चेअरमन विनय सहस्रबुद्धे यांनी सोमवारी या बद्दल माहिती दिली. 2 दिवसाच्या या सुशासन महोत्सवाच उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा करणार आहेत. या महोत्सवात 3 राज्यांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री मनसुख मंडवीय आणि जम्मू-काश्मीरचे एनजी मनोज सिन्हा सहभागी होणार आहेत. येत्या 9 फेब्रुवारीपासून हा महोत्सव सुरु होणार आहे.

उत्तर प्रदेश, आसाम आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. योगी आदित्यनाथ, हिमंत बिस्वा सरमा आणि मोहन यादव जनपथ रोडवर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये स्वायत्त चॅरिटेबल ट्रस्ट रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून आयोजित ‘सुशासन महोत्सवाला’ संबोधित करतील.

इरादे खूप चांगले असतात, पण….

केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया आणि जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा या कार्यक्रमात सहभागी होतील. यात अनेक खासदार आणि मंत्री सुद्धा सहभागी होतील. सुशासन आणि विकास फक्त सरकारी कार्यक्रम नको, ते एक जनआंदोलन हवं, असं पीएम मोदी नेहमी म्हणतात, असं सहस्रबुद्धे म्हणाले. लोक यामागचा अर्थ समजून घेतली, तेव्हाच हे जनआंदोलन बनेल. ‘सुशासन महोत्सवा’च्या माध्यमातून गव्हर्नसबद्दल साक्षरता वाढवण्याची आवश्यकता आहे.

सगळ्याच सरकारांचे इरादे खूप चांगले असतात. पण जमिनीवर योजनांची अमलबजावणी अयशस्वी होताना दिसते. अशा स्थितीत सध्या देशात योजनांनी खूप चांगल्या पद्धतीने अमलबजावणी सुरु आहे. गव्हर्नेसबद्दल माहिती देणं, हा या महोत्सवाचा मागचा उद्देश आहे.

कोण-कोण सहभागी होणार?

केंद्र सरकार, राज्य सरकारची विविध मंत्रालय, सार्वजनिक संस्था आणि NGO या महोत्सवात सहभागी होणार आहेत. हा महोत्सव 2 दिवसांचा असेल. यात एका पुस्तकाच विमोचन होईल. महोत्सवाचा संपूर्ण फोकस पूर्वोत्तर राज्य आणि युवा वर्ग असेल. भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा एका पुस्तकाच विमोचन करतील. विनय सहस्रबुद्धे आणि मुकुल प्रियदर्शी यांनी संपादन केलेल्या लेखांच यामध्ये संकलन आहे. ‘The Art of implementation: as mastered by PM Narendra Modi’ असं या पुस्तकाच नाव आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.