‘पंतप्रधान सांगत होते…’ मोदींनी योगींना त्या व्हायरल फोटोंमध्ये काय सांगत होते, राजनाथ सिंहांनी केला खुलासा
पंतप्रधान मोदी आदित्यनाथ यांना नेमके काय बोलत आसावेत? असा प्रश्न सोशल मिडीयावर सत्त विचारला जातोय आणि नेटकरी आपले तर्क-वितर्क लावत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवून चालत आहेत, असे दोन फोटो सोशल मिडीयावर वायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये योगी आणि मोदींमध्ये काही गहन चर्चा सुरू आहे, असं दिसते. मात्र, पंतप्रधान मोदी आदित्यनाथ यांना नेमके काय बोलत आसावेत? असा प्रश्न सोशल मिडीयावर सत्त विचारला जातोय आणि नेटकरी आपले तर्क-वितर्क लावत आहेत. पण आता संरक्षण मंत्री आणि भाजपचे लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांनी हे रहस्य उघड केले आहे.
गुरुवारी ट्विटकरत सिंह म्हणाले की, “लोकं विचारात पडले आहेत की यूपीच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नेमके काय बोलत होते? तर, पीएम म्हणत होते की योगी एका दिग्गज क्रिकेटपटूप्रमाणे फलंदाजी करत आहेत आणि त्यांनी त्यांची कामगिरी अशीच चालू ठेवावी, ज्यामुळे भाजपला विजय मिळवायला मदत होईल.”
अभी एक फोटो ट्वीट किया गया जिसमें मोदी जी ने योगी जी के कंधे पर हाथ रखा हुआ हुआ था। यह फोटों देखकर सभी लोग सोच रहे थे कि मोदीजी उनसे क्या कह रहे थे.. pic.twitter.com/HBD5NESCxZ
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 25, 2021
यूपी निवडणुकीपूर्वी हे फोटो शेअर केले गेले
यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी 21 नोव्हेंबर रोजी त्यांचे आणि पीएम मोदींचे फोटो ट्विट केले होते, जेव्हा पंतप्रधान अखिल भारतीय डीजी कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी लखनौमध्ये होते. फोटोंसोबत, यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपला कसा बदल घडवून आणायचा आहे, याचे सुचक विधान करणारे कैप्शन दिले होते.
2022 च्या यूपी निवडणुकीपूर्वी त्यांचे हे फोटो महत्त्वपूर्ण मानले गेले. अनेकांनी सांगितले की फोटोंमध्ये पंतप्रधान मोदींचा योगी आदित्यनाथ यांना पूर्ण पाठिंबा देत असल्याचे दर्शविले गेले आहे. तसेच, अलीकडे दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगींना राजकीय ठराव मांडण्याचे महत्तवाचे काम सोपवण्यात आले होते. यावरून दिल्लीमधल्या भाजपच्या सर्व बड्या नेत्यांचा पाठींबा असल्याचं लक्षात येतं. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही म्हटले होते की, जर यूपीच्या लोकांना 2024 मध्ये नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून पाहायचे असेल, तर त्यांना 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करावी लागेल.
इतर बातम्या