Presidential Election 2022 : देशाला मजबूत राष्ट्रपती द्यायचा असेल तर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पवारांना पाठिंबा द्या; राऊतांचं भाजपला आवाहन

Sanjay Raut : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी उद्या विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचं राऊत यांनी सांगितलं. उद्या आदित्य ठाकरे अयोध्येत आहेत.

Presidential Election 2022 : देशाला मजबूत राष्ट्रपती द्यायचा असेल तर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पवारांना पाठिंबा द्या; राऊतांचं भाजपला आवाहन
देशाला मजबूत राष्ट्रपती द्यायचा असेल तर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पवारांना पाठिंबा द्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 12:30 PM

मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी उद्या विरोधी पक्षांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपला जर देशाला मजबूत राष्ट्रपती द्यायचा असेल, संविधानाचं रक्षण करणारा राष्ट्रपती द्यायचा असेल तर त्यांनी शरद पवार यांनाच पाठिंबा दिला पाहिजे. देश उभा करायचा आहे. या देशाच्या घटनेचं रक्षण करायचं आहे. या देशातील जनतेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे. या देशाला एखाद्या नेत्याच्या अनुभव होणार असेल तर तो नेता फक्त शरद पवारच (sharad pawar) आहेत. पण राज्यकर्त्यांचं मन त्यासाठी मोठं असावं लागतं. मन मोठं असेल तर ते अशा प्रकारचा निर्णय घेतात, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत हे अयोध्येत आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाबाबतच्या निवडणुकीवर भाष्य केलं. शरद पवारांनी विरोधी आघाडीचं नेतृत्व केलं पाहिजे. देशात आणि विरोधी पक्षात त्यांच्यासारखा अनुभवी आणि प्रभावी नेता नाहीये. पवारांनी या विरोधी आघाडीचं नेतृत्व केलं पाहिजे. त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी उभं राहण्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवली तर या निकालात फेरफार होऊ शकतो. पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजकारणापलिकडे आणि पक्षाच्या पलिकडे आहे. हे सर्व लोक पवारांच्या मागे उभे राहतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे निर्णय घेतील

उमेदवार मजबूत असावा. विरोधी पक्षाचा असला तरी हा चेहरा राष्ट्रपतीपदाचा असावा असं जनतेला वाटावं. तो उभा करणं महत्त्वाचा आहे. तसा चेहरा दिल्यास उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे गैरहजर राहणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी उद्या विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचं राऊत यांनी सांगितलं. उद्या आदित्य ठाकरे अयोध्येत आहेत. हा पूर्वनियोजित दौरा असल्याने राऊतही विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, शिवसेनेचा एक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासूनच मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुण्यातील शिवसैनिक अयोध्येत आले आहेत. या शिवसैनिकांनी सर्वत्र होर्डिंग्ज लावले आहेत. संपूर्ण रस्ते आदित्य ठाकरे यांच्या होर्डिंग्ज आणि बॅनर्सने सजले आहेत. शरयू तिरावर होणाऱ्या आरतीचीही शिवसैनिकांकडून तयारी करण्यात आली आहे. हा कार्यक्रम छोटा आहे. पण महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

असा आहे आदित्य ठाकरेंचा दौरा

सकाळी 11.00 वाजता लखनौ विमानतळावर आगमन दुपारी 1.30 वाजता : अयोध्येत आगमन, हॉटेल पंचशील दुपारी 3.30 : पत्रकार परिषद इस्कॉन मंदिर, राम नगर दुपारी 4.45 वाजता) 5.30 वाजता: रामललाचे दर्शन: श्री रामजन्मभूमी, अयोध्या संध्याकाळी 6.30: शरयू आरती: नया घाट, अयोध्या 7.30 वाजता : लखनौसाठी प्रस्थान

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.