आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार

आसामच्या विधानसभा निडणुकीचं बिगूल वाजताच भाजपने जागा वाटपाचा तिढाही सोडवला आहे. (BJP To Contest 92 Seats In Assam, 26 For AGP, 8 For Others)

आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार
आरक्षणाबाबत भाजपची विचारधारा वेगळीच
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 8:28 AM

गुवाहाटी: आसामच्या विधानसभा निडणुकीचं बिगूल वाजताच भाजपने जागा वाटपाचा तिढाही सोडवला आहे. भाजपने मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजप, एजीपी आणि यूपीपीएल एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. आसाम गण परिषद (अगप) 26, यूपीपीएल 8 तर भाजप 92 जागांवर लढणार आहे. (BJP To Contest 92 Seats In Assam, 26 For AGP, 8 For Others)

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुरुवारी या फॉर्म्युल्याला अंतिम स्वरुप दिलं आहे. काल भाजप मुख्यालयात पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती. या बैठकील पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. तर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी आसामच्या निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मंत्री हिंमत बिस्वा सरमा, आसाम प्रभारी बैजयन्त पांडा आणि सह प्रभारी पवन शर्माही उपस्थित होते.

गेल्या निवडणुकीत 60 जागांवर विजय

आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 60 जागांवर विजय मिळला होता. गेल्या निवडणुकीत बोडोलँड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) भाजप आणि अगपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी बीपीएफने 12 जागा जिंकल्या होत्या. यावेळी बीपीएफने काँग्रेस आणि एआययूडीएफसोबत आघाडी केली आहे.

सत्ता राखण्याचं आव्हान

या निवडणुकीत भाजपला सत्ता राखण्याचं आव्हान असणार आहे. यावेळी भाजपचा थेट सामना काँग्रेस-एआययूडीएफ आघाडीशी होणार आहे. गेल्या दहा वर्षातील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावून भाजप गेल्यावेळी सत्तेत आली होती. त्यामुळे सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका

आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका होतील. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे आणि 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. (BJP To Contest 92 Seats In Assam, 26 For AGP, 8 For Others)

संबंधित बातम्या:

पुद्दुचेरीत शिवसेनेच्या भूमिकेत एनआर काँग्रेस, भाजपा चेकमेट?

पश्चिम बंगाल विधानसभेच्या उमेदवारांबाबत भाजपचं मंथन सुरु, ममता बॅनर्जींविरोधात भाजपकडून कोणता चेहरा?

केरळमध्ये सत्ता आल्यास पेट्रोल 60 रुपये लिटर, भाजप नेत्याचं आश्वासन

‘मिशन केरळ’साठी भाजपची मोठी खेळी; मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी

(BJP To Contest 92 Seats In Assam, 26 For AGP, 8 For Others)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.