बिहारनंतर पुढच्यावर्षी पाच राज्यांमध्ये निवडणूक, भाजपपुढे ‘या’ दोन राज्यांमध्ये कडवं आव्हान

बिहार निवडणुकीनंतर 2021 मध्ये येऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल का? हे पाहणं महत्त्वांचं ठरणार आहे (BJP to give tough fight in Bengal and Assam election 2021).

बिहारनंतर पुढच्यावर्षी पाच राज्यांमध्ये निवडणूक, भाजपपुढे 'या' दोन राज्यांमध्ये कडवं आव्हान
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 3:44 PM

मुंबई : बिहार विधानसभेची निवडणूक शांतपणे पार पडली. कोरोना संकटातील ही पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वसामान्य नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांसोबत पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरली. पण एनडीएला राष्ट्रीय जनता दलने (राजद) कडवी झुंज दिली. राजद नेते तेजस्वी यादव यांचं मोठं आव्हान भाजपला होतं. मात्र, अखेर भाजपप्रणित एनडीएची सत्ता स्थापन झाली. बिहार निवडणुकीनंतर 2021 मध्ये येऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला असंच यश मिळेल का हे पाहणं महत्त्वांचं ठरणार आहे (BJP to give tough fight in Bengal and Assam election 2021).

बिहारमध्ये मित्रपक्षांसोबत सत्ता स्थापन करण्यात भाजप यशस्वी ठरली. मात्र, पुढच्यावर्षी म्हणजेच आगामी 2021 मध्ये देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या पाच पैकी दोन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याचं भाजप पुढे मोठं आव्हान आहे. आता या निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळेल का? हा येणारा काळ ठरवेल. पण या निवडणुका रंजक ठरण्याची शक्यता आहे (BJP to give tough fight in Bengal and Assam election 2021).

1) पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये 2021 साली 294 जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यात सध्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सर्वाधिक 211 जागांवर बहुमत मिळालं होतं. काँग्रेसला 44, डाव्या पक्षाला 26 तर भाजपला फक्त 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

पश्चिम बंगालमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी 148 जागांवर विजय मिळणं गरजेचं आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत फक्त तीन जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपने यावेळी प्रचंड तयारी केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार, असा तेथील भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: 200 पेक्षा जास्त जागा जिंकून आणण्याचा निर्धार केला आहे. 2017 साली भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं होतं. बंगाल आणि ओदीशामध्ये जेव्हा विजय होईल तेव्हापासून भाजपच्या स्वर्णयुगाला सुरुवात होईल, असं ते म्हणाले होते.

2) आसाम

आसाममध्ये 2021 च्या मार्च-एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत. 2016 च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. आसाम राज्यात काँग्रेसचे 25 आमदार आहेत. तर भाजपचे 61 आमदार आहेत. भाजपचे मित्रपक्ष असलेले गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांचे क्रमश: 14 आणि 12 सदस्य आहेत. या मित्रपक्षांच्या आधारावरच भाजप 2016 साली सत्ता स्थापन करु शकली. दरम्यान, सध्या विरोधात बसलेल्या काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकीत सीपीआय आणि सीपीआय एमएल या डाव्या पक्षांसोबत हातमिळवणी करणार असल्याचं घोषित केलं आहे.

3) तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या या राज्यात एआयएडीएमके या पक्षाची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत एआयएडीएमके आणि मित्रपक्षाला 134 जागांवर विजय मिळाला होता. दुसऱ्या क्रमांकावर डीएमके पक्ष होता. या पक्षाला 98 जागांवर विजय मिळाला होता. तमिळनाडूत सत्ता स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता असते. सध्या ई पलानस्वामी हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत.

तमिळनाडूत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एआयएडीएमकेसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही हे अजून निश्चित नाही. केंद्रात दोन्ही पक्षांची युती आहे. एआयएडीएमके एनडीएचा घटक पक्ष आहे.

तमिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक ही वेगळी होणार आहे, कारण ही निवडणूक एआयएडीएमके पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता आणि डीएमके पक्षाचे दिवंगत नेते करुणानिधी यांच्याशिवाय पार पडणार आहे. आगामी निवडणुकीत डीएमकेची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष एमके स्टालिन यांच्यावर असणार आहे. दुसरीकडे अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उरण्याची शक्यता आहे.

4) पंडुचेरी

पंडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहेत. पंडुचेरीत 2021 साली 30 जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 15 जागांवर विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ एआयडीएमकेला 4, एआयएनआरसीला 8, डीएमकेला 2 जागांवर विजय मिळाला होता. पंडुंचेरीत काँग्रेस आणि डीएमकेचं गठबंधन आहे. तर एआयडीएमके आणि एआयएनआरसी विरोधीपक्षात आहे. इथे सरकार स्थापन करण्यासाठी 16 जागांची आवश्यकता आहे.

5) केरळ

केरळमध्ये विधानसभेच्या 140 जागा आहेत. या राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी 71 जागांची आवश्यकता असते. सध्या इथे सीपीआयच्या (एम) नेतृत्वातील लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटची (एलडीएफ) सत्ता आहे. पिनराई विजयन केरळचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत एलडीएफला सर्वाधिक 91 जागांवर यश मिळालं होतं.

दरम्यान, पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केरळमध्ये तयारीला सुरुवात केली आहे. भाजप नेते सध्या तेथील स्थानिक मुद्द्यांना हात घालत आहेत. विशेष म्हणजे भाजप तिथे लव्ह-जिहादचा मुद्दा उचलून धरत आहे. केरळमध्ये 30 टक्के मुस्लिम जनता आहे तर 20 टक्के ख्रिस्ती जनता आहे. याच 50 टक्क्यांचा विचार करुन भाजप निवडणुकीची रणनिती आखत आहे.

हेही वाचा :

बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे 7-7 मंत्री, भाजपच्या खात्यात दोन उपमुख्यमंत्रिपदं

नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.