मोदी 3.0, भाजपला किती जागा मिळणार, ब्रोकरेज हाऊसचे आकडे आलेत…

lok sabha election 2024: ब्रोकरेज हाऊस आयआयएफएलने बेस केसमध्ये भाजपला 320 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जेएमएफएलनुसार भाजप 299 जागांवर विजयी होईल. बियर केसमध्येही भाजपला 290 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बुल केसमध्ये भाजपला 310 जागा मिळतील.

मोदी 3.0, भाजपला किती जागा मिळणार, ब्रोकरेज हाऊसचे आकडे आलेत...
शेअर बाजारात येणार तुफान
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 10:36 AM

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे आली आहे. शेवटचा सातवा टप्पा आज 1 जून रोजी सुरु झाला आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून जाहीर होणार आहे. यामुळे या दिवशी कोणाला किती जागा मिळणार? हे स्पष्ट होणार आहे. परंतु राजकीय विश्लेषक निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी करत आहेत. आता भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार की 2004 प्रमाणे ‘इंडिया शायनिंग’ सारखी परिस्थिती होईल, हे 4 जून रोजी समजणार आहे. आता देशातील विविध ब्रोकरेज हाऊसकडून भाजपला किती जागा मिळणार? त्यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ब्रोकरेज हाऊस फिलिपकॅपिटल, आयआयएफएल, जेएमएफएल आणि बर्नस्‍टीन यांनी आपला अंदाज वर्तवला आहे. सत्ताधारी भाजप आणि एनडीएला ब्रोकरेज हाऊसने किती जागा दिल्या आहेत पाहू या…

काय आहे अंदाज

फिलिपकॅपिटलच्या अंदाजानुसार, बेस केस म्हणजेच सामान्‍य परिस्‍थ‍ित‍ीत भाजपला 290-300 जागा मिळतील तर एनडीएला 330-340 जागा मिळणार आहेत. निकाल या अंदाजानुसार आल्यास इक्विटी, कॉर्पोरेट आय आणि अर्थव्यवस्थेत सकारात्मक दृष्टिकोण दिसणार आहे. या ब्रोकरेज हाऊसने बुल केस म्हणजेच आक्रामक परिस्थितीत भाजपला 325 जागा मिळणार असल्याचे जाहीर केले. तसेच एनडीएला 360 जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. बियर केस म्हणजे खराब परिस्‍थ‍ित‍ीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही. परंतु एनडीएचे सरकार येईल.

इतर ब्रोकरेज हाऊसचा अंदाज काय?

ब्रोकरेज हाऊस आयआयएफएलने बेस केसमध्ये भाजपला 320 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जेएमएफएलनुसार भाजप 299 जागांवर विजयी होईल. बियर केसमध्येही भाजपला 290 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बुल केसमध्ये भाजपला 310 जागा मिळतील.

हे सुद्धा वाचा

ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनचा भाजप आणि एनडीएबाबतचा अंदाज खूपच जास्त आहे. बेस केसमध्ये, त्यांनी एनडीएला 330-350 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बुल केसमध्ये एकट्या भाजपला 290 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर एनडीएला 340 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. एकंदरीत बहुतांश ब्रोकरेज हाऊसचा अंदाज भाजपच्या बाजूने आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करेल, असे त्यांना वाटते. 2004 मधील ‘इंडिया शायनिंग’च्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.