लोकसभा निवडणुकीआधी भाजप खेळणार मास्टर स्ट्रोक, पाहा काय आहे प्लॅन
Lok Sabha elections : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्याआधी भाजपने कंबर कसली आहे. एनडीएला ४०० हून अधिक जागा जिंकवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी भाजपने काय योजना आखली आहे जाणून घ्या.
Loksabha election 2024 : भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीत 370 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. तर एनडीएला 400 हून अधिक जागांचा अंदाज वर्तवला आहे. यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अबकी बार ४०० पार असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे बुथ लेव्हलपासून भाजप कामाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने काम सुरु केले आहे. भाजपला जर ३७० जागा जिंकायच्या असतील तर त्यांंना इथपर्यंत पोहोचवण्यासाठी निम्मी लोकसंख्या विशेष भूमिका बजावणार आहे. त्यामुळे भाजपने महिला सक्षमीकरणाच्या रणनीतीवर लक्ष केंद्रित केले आहे.
महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर
देशभरातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी 4 ते 6 मार्च दरम्यान देशभरात महिला मॅरेथॉन, महिला स्कूटर आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. मॅरेथॉन आणि स्कूटर रॅलीमध्ये सर्वसामान्य महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी भाजपने अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मदत घेतली आहे.
शक्ती वंदन रॅली
6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये सुमारे एक लाख महिलांच्या सभेला संबोधित करणार आहेत. या रॅलीपूर्वी देशभरातील महिलांना एकत्र करण्यासाठी भाजप महिला मोर्चा शक्ती वंदन रॅलीच्या नावाने देशव्यापी मोहीम राबवणार असून, त्यात महिलांची मॅरेथॉन आणि महिलांची स्कूटर आणि बाइक रॅली यशस्वी करण्यावर भर दिला जाणार आहे.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिला मॅरेथॉन
रॅली आणि मॅरेथॉन थेट भाजपच्या बॅनरखाली होणार नाहीत. महिलांना जोडण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने महिला खेळाडू, महिला विद्यार्थी आणि व्यावसायिक महिलांसह समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. कार्यक्रमानुसार 4 मार्च रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिला मॅरेथॉन काढण्यात येणार असून, 5 मार्च रोजी विधानसभानिहाय महिलांची स्कूटर आणि बाइक रॅली काढण्यात येणार आहे.
महिला मोर्चाची पूर्ण तयारी
महिला मोर्चाच्या या रॅलीनंतर तिसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी बंगालमध्ये महिलांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या सभेचे थेट प्रक्षेपण प्रभाग स्तरावर नेण्याचा भाजपचा प्लान आहे. निवडणुकीत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मोठा मास्टर प्लॅन बनवला आहे.