भाजपनं गुजरातचं मैदान मारलं, आता लक्ष्य 2024, पुढच्यावर्षी सेमीफायनल, मोदी है तो मुमकिन है?

भाजपनं गुजरात जिंकलं. त्यामुळं भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला असेल. खरंतर आता सर्वच राजकीय पक्षांची नजर आता 2024च्या लोकसभा निवडणुकीकडे आहे.

भाजपनं गुजरातचं मैदान मारलं, आता लक्ष्य 2024, पुढच्यावर्षी सेमीफायनल, मोदी है तो मुमकिन है?
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 11:25 PM

गांधीनगर : भाजपनं गुजरात जिंकलं. त्यामुळं भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला असेल. खरंतर आता सर्वच राजकीय पक्षांची नजर आता 2024च्या लोकसभा निवडणुकीकडे आहे. आणि विशेष म्हणजे पुढच्या वर्षीच सेमीफायनल आहे. कारण 9 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. भाजपचा आजचा जल्लोष हा गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयानंतरचा आहे. पण स्वत: पंतप्रधान मोदींची तयारीही 2024 साठी आहे. भाजपनं गुजरात जिंकलं असलं तरी, हिमाचल गमावलंय. कारण हिमाचलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालंय. एकूण 68 जागांपैकी, काँग्रेसचे 39 आमदार निवडून आलेत. इथं बुहमताचा आकडा 35 इतका आहे. भाजपला 26 जागा मिळाल्यात. तर इतरांच्या खात्यात 3 जागा आल्यात.

गुजरात आणि हिमाचलच्या निकालानंतर, देशातल्या कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे तेही महत्त्वाचं आहे. देशातील 10 राज्यांत भाजपची स्वबळावर सत्ता आहे. त्यात गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचा समावेश आहे. या 10 ठिकाणी भाजपचा मुख्यमंत्री आहे.

मित्र पक्षांसह 4 राज्यात भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रात शिंदे गटासोबत भाजप सत्तेत, नागालँडमध्ये NDPP सोबत सत्तेत, मेघालयमध्ये NPP आणि केंद्रशासित पुदुच्चेरीत एनआर काँग्रेससोबत भाजप सत्तेत म्हणजेच इथं NDAचं सरकार आहे. काही महिन्यांआधीच नितीश कुमारांनी साथ सोडल्यानं भाजपनं बिहार गमावलं आणि आता हिमाचलही हातून निसटलंय.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसबद्दल जर बोलायचं झालं तर, काँग्रेस देशभरात अवघ्या 4 राज्यात आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असून इथं काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये आरजेडी-जेडीयूसोबत काँग्रेस सत्तेत आहे. आणि आता हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता आलीय.

गुजरातच्या निवडणुकीत भाजपनं वनसाईड मॅच जिंकलीय. त्याचं कारण म्हणजे विरोधकांमधील मतांची विभागणी. यावरुनच ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी भाजप आणि केजरीवालांवर साटंलोटं केल्याचा आरोप आहे. दिल्ली महापालिकेच्या मोबदल्यात भाजपला गुजरात दिल्याचा राऊतांनी आपवर आणि भाजपवर केलाय.

आजच्या तारखेपासून 2024 ची लोकसभा निवडणूक ही दीड वर्षांवर आहे. भाजपनं आतापासून मोदींनाच 2024 मध्ये हॅट्ट्रिक करण्यासाठी प्रोजेक्ट केलंय. आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी 2023मध्येच सेमीफायनल आहे. कारण 2023 मध्ये फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत 9 राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगाणा, त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोरामचा समावेश आहे. या 9 राज्यांपैकी भाजप सध्या 5 राज्यात सत्तेत आहे. इथं एकूण 113 लोकसभेच्या जागा आहेत.

गुजरातमध्ये भाजप जिंकणार हे दिसत होतंच. पण विरोधक आव्हान निर्माण करतील, असं वाटत होतं. मात्र एकतर विरोधकांमध्ये नसलेली एकजूट आणि त्यानंतर झालेली मतंविभागणी, भाजपच्या पथ्यावर पडली. त्यामुळं ही बाब विरोधक किती लक्षात घेतात, हे काळच ठरवेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.